Santosh Bangar : ‘..नाहीतर रट्टेच देतो’ आमदार संतोष बांगर कोणावर संतापले?  दमदाटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Santosh Bangar : आमदार संतोष बांगर पुन्हा वादात अडकले आहेत. यावेळी त्यांनी कोणाला धमकावले, ते पाहुयात..

Santosh Bangar : '..नाहीतर रट्टेच देतो' आमदार संतोष बांगर कोणावर संतापले?  दमदाटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बांगर पुन्हा आक्रमकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 7:38 PM

हिंगोली : कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) आणि वाद हे समीकरण काही सूटता सूटताना दिसत नाही. मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांसोबतच वाद शमतो ना शमतो तोच, ते आता पुन्हा एका वादात (Controversy) अडकले आहेत. महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी फोनवरुन दिलेली धमकी सध्या सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आता त्यांचे कान टोचतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वादात अडकण्याची बांगर यांची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी ही त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीची धमकी आणि शिवीगाळ केली होती. तर पीक विम्या संदर्भात विमा कार्यालयात जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड सर्वांनीच पाहिली होती.

महावितरणने सध्या वसूली मोहिम सुरु केली आहे. वीज बिल न भरल्यास वीज जोडणी तोडण्याचे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांनी थेट आमदार बांगर यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन करुन धमकावले.

हे सुद्धा वाचा

इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, असा इशाराच त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला दिला. बांगर यांनी केलेल्या दमदाटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कृषी पंपाच्या थकीत बिलापोटी वीज कापण्याची मोहिम सुरु आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांनी फिर्याद केल्यावर आमदार संतोष बांगर चांगलेच संतापले. त्यांनी फोनवरुनच कर्मचाऱ्यांना फटकाविण्याची धमकी दिली.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी न तोडण्याचे निर्देश यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर ही मोहिम थंडावली होती. पण अनेक भागात कर्मचाऱ्यांना थकीत बिल वसूलीचे टार्गेट देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचा नाईलाज होतो.

यंदा पावसाने डोळे वटरल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वीज बिलात सवलत मागत आहेत. वीज बिल माफ करण्याची मागणी ही जोर धरत आहे. बांगर यांच्या आक्रमकपणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.