‘टक्केवारी गोळा करण्याशिवाय सातारा विकास आघाडीकडं दुसरं काम नाही’, शिवेंद्रराजे यांचं उदयनराजेंवर पुन्हा टीकास्त्र

आ. शिवेंद्रराजे यांनी येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नगरसेवकांना फंड गोळा करण्यासाठी कामे होतात का असा प्रश्न उपस्थित केला आहे. हद्दवाढीतील भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची पालिकेने उधळपट्टी केल्या याबाबत आम्ही राज्य सरकार किंवा संबंधित मंत्र्यांकडे तक्रार करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

'टक्केवारी गोळा करण्याशिवाय सातारा विकास आघाडीकडं दुसरं काम नाही', शिवेंद्रराजे यांचं उदयनराजेंवर पुन्हा टीकास्त्र
आमदार शिवेंद्र राजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 5:23 PM

सातारा : नगरपालिकेची निवडणूक (Municipal Election) जवळ येताच खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले (Shivendra Raje Bhosle) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. आमदार शिवेंद्र राजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले एकाच पक्षात असूनही दोघांमधूनही विस्तव जात नाही. संधी मिळताच दोन्ही नेते एकमेकांना टोला लगावल्या शिवाय राहत नाहीत. साताऱ्यातील राजकीय वर्चस्वावरून या दोन्ही नेत्यांमध्ये कायम टशन पहायला मिळत असते. आता पुन्हा हा संघर्ष सातारा पालिकेची निवडणूकीवरून चांगलाच पेटला आहे. तर खासदार उदयनराजे यांची सातारा विकास आघाडी आणि आमदार शिवेंद्रराजे यांची नगर विकास आघाडी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू पहायला मिळत आहेत. सध्या खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता असून आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे.

अधिकाऱ्यांना सूचना

दरम्यान आता काहीच महिन्यातरा राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूका लागण्याच्या शक्यता आहे. तर सातारा नगरपालिकेत सध्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे निधीचा योग्य वापर व्हावा तो वापरा यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरपालिकेत बैठक घेतली. तसेच त्यांनी या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना विकास कामे तातडीने सुरू करा अशा सूचना केल्या. त्यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, मुळात हे रस्ते सातारकरांसाठी होतात की ठेकेदारांसाठी.

हे सुद्धा वाचा

राज्य सरकार किंवा संबंधित मंत्र्यांकडे तक्रार

तसेच आ. शिवेंद्रराजे यांनी येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नगरसेवकांना फंड गोळा करण्यासाठी कामे होतात का असा प्रश्न उपस्थित केला आहे. हद्दवाढीतील भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची पालिकेने उधळपट्टी केल्या याबाबत आम्ही राज्य सरकार किंवा संबंधित मंत्र्यांकडे तक्रार करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्यातील वाद हा आता पेटण्याचे दिसत आहे. तर आमदार शिवेंद्रराजे यांच्या टीकेला खासदार उदयनराजे भोसले कोणते उत्तर देतात याकडेही सातारकरांचे लक्ष लागले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.