Satara | ‘काय बाई सांगू?’, उदयनराजेंचा सवाल, ‘एकदाचं सांगूनच टाका’, शिवेंद्रराजेंचा जवाब!
नेहमीप्रमाणेच आताही उदयनराजेंची नौटंकी सुरु असून दहा-दहा मिनिटं रडायचं, लोकांचे मुके घ्यायचे, असे डावपेच वापरले जात असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसलेंनी यावेळी केली आहे.
सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीच्या (Satara Municipality Election) पार्श्वभू्मीवर राजकीय वातावरण तापलंय. आरोप-प्रत्यारोप, सवाल जवाब, ऐन रंगात आले आहेत. नुकतच खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवेंद्र राजे यांना एका गाण्यातून डिवचलं होतं. त्यानंतर आता आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनीही (Shivendraraje Bhosale) उदयनराजे भोसलेंना प्रत्युत्तर दिलं.
‘काय बाई सांगू, कसं गं सांगू, मलाच माझी वाटे लाज’, हे गाणं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी एका व्यासपीठावर गायलं. सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्र राजेंना चर्चेला येण्याचं ओपन चॅलेंज दिलं होतं. तेव्हा उदयनराजेंनी गाणं गायल्यानंतर एकच हशा पिकला होता. यावेळी शिवेंद्रराजे भोसलेंच्या टीकेला उदयनराजेंनी उत्तरही दिलं होतं.
‘एकदाचं सांगूनच टाका!’
दरम्यान, आता ‘काय बाई सांगू?’ या गाण्यातून जो सवाल उदयनराजेंनी विचारला होता, त्याला शिवेंद्रराजेंनीही जवाब दिलाय. नेमकी तुम्हाला लाज कशाची वाटते, ते एकदाचं सांगूनच टाका, असं म्हणत शिवेंद्रराजेंनी पुन्हा एकदा उदयराजेंवर हल्लाबोल केलाय.
रडारड, नौटंकी आणि ‘मुके’!
यावेळी शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजे भोसलेंवर सडकून टीका करताना सातारा नगरपालिकेत गेल्या पाच वर्षात काय कामं केली, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणेच आताही उदयनराजेंची नौटंकी सुरु असून दहा-दहा मिनिटं रडायचं, लोकांचे मुके घ्यायचे, असे डावपेच वापरले जात असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसलेंनी यावेळी केली आहे.
काय आहे वाद?
सातारा नगरपालिकेची इमारत बांधणीवरुन शिवेंद्रराजे भोसलेंनी आरोप केले होते. या इमारतीबाबत कोणतीत तांत्रिक, कागदोपत्री माहिती नसताना त्याच्यावर या इमारतीच्या भूमिपुजनाचं काम करण्यात आलं असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती. गेली पाच वर्ष सातारा नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. अशातच आगामी नगरपालिका निवडणुकीत राजे विरुद्ध राजे असा सामना रंगत असल्याचं चित्र आतापासूनच पाहायला मिळतंय.
पाहा व्हिडीओ –
इतर राजकीय बातम्या –
अध्यापक विकास संस्था शहाण्यांना अधिक शहाणं करणार; सुपेंबद्दल अजितदादा नेमकं काय म्हणाले?