अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनीमुनला गेलेत का? आता महिला भाजप आमदार म्हणतात, आम्ही आदर करतो!
शरद पवार ईडी चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार होतात, पण अनिल देशमुख का होत नाही? असं महाले यांनी विचारलंय. तर अमृता फडणवीस या उपरोधिकपणे बोलल्या आहेत. सत्ताधारी पक्षाच्या सिनियर नेत्या म्हणून विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनीही महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे, असा खोचक टोलाही महाले यांनी लगावलाय.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला आहे. त्यावरुन राज्यात जोरदार राजकारण रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवेसनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. दुसरीकडे भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी अनिल देशमुख वयाने मोठे आहेत. त्यांचा आदर आम्ही नक्कीच करतो. मात्र, त्यांनी चौकशीला सामोरं जायला हवं, असं म्हटलंय. (Shweta Mahale’s reaction on Amrita Fadnavis’s criticism of former Home Minister Anil Deshmukh)
अमृता फडणवीस यांनी देशमुखांवर केलेल्या टीकेबाबत श्वेता महाले यांना विचारण्यात आलं. त्यावेळी हा संस्काराचा विषय नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख वयाने मोठे आहेत. त्यांचा आदर आम्ही नक्कीच करतो. तसंच ते जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे ते चौकशीला सामोरे का जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतोय. शरद पवार ईडी चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार होतात, पण अनिल देशमुख का होत नाही? असं महाले यांनी विचारलंय. तर अमृता फडणवीस या उपरोधिकपणे बोलल्या आहेत. सत्ताधारी पक्षाच्या सिनियर नेत्या म्हणून विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनीही महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे, असा खोचक टोलाही महाले यांनी लगावलाय.
अमृता फडणवीसांचा अनिल देशमुखांना टोला
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खोचक टोला लगावला आहे. ‘एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी घोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय.
ड्रग्स प्रकरणातील कारवाईचं जोरदार समर्थन
त्याचबरोबर ‘इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते’, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी एनसीबीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.
अमृता फडणवीसांच्या टीकेला मनिषा कायंदेंचं उत्तर
अमृता फडणवीस यांच्या टीकेला मनिषा कायंदे यांनी उत्तर दिलंय. कायंदे म्हणाल्या, “सामनातून भारतीय जनता पार्टीवर टीका होत असताना अमृता वहिनी मात्र अस्वस्थ होतात. आमच्याकडे तर अशी माहिती आहे की अमृता वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय, प्रवक्ता व्हायचंय. त्यासाठी त्या भारतीय जनता पार्टीवर दबाव आणत आहेत” माजी गृहमंत्री हनिमूनला गेले की काय…? अमृता फडणवीस यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना कायंदे म्हणाल्या, “तुमच्याकडे सर्व तपास यंत्रणा आहेत. तुम्ही शोधू शकता!”. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “सामनाचे अग्रलेख वाचण्यासाठी विचारांची शक्ती लागते ती तुमच्याकडे नाही.”
इतर बातम्या :
Shweta Mahale’s reaction on Amrita Fadnavis’s criticism of former Home Minister Anil Deshmukh