मुख्यमंत्र्यांना मंगळ, भाजप आमदाराकडून अंमळनेर मंदिरात महाभिषेक
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM devendra fadanvis) यांच्या शपथविधीची तारीख निश्चित होत नाही. त
जळगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM devendra fadanvis) यांच्या शपथविधीची तारीख निश्चित होत नाही. तसेच मुख्यमंत्र्यांना मंगळ असल्याने शपथविधीमध्ये मंगळ (mars puja) आडवा येऊ नये यासाठी आमदार स्मिता वाघ आणि माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली थेट अंमळनेर येथील प्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात महाभिषेक करण्यात आला. त्यामुळे राज्यात सर्वत्र मुख्यमंत्र्यांच्या (CM devendra fadanvis) मंगळ (mars puja) ग्रहावरुन चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे.
कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून निश्चितपणे मंगळदेवाला काहीतरी चांगले घडण्यास प्रवृत्त करणार, अशी भावना मंदिराच्या पुजारींनी व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते महाभिषेक घालण्यासाठी अंमळनेर येथील मंदिरात दाखल झाले होते.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला जनादेश मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु मुख्यमंत्रिपदावरुन युतीत घोडे अडल्याने महायुतीची सत्ता स्थापन होण्यास विलंब होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख लांबत चालली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात उत्तम काम केले आहे. पुन्हा तेच नेतृत्व राज्याला लाभावे अशी जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु तिढा सुटतच नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळ असून या कार्यात त्यांना मंगळच आडवा येत असल्याची माहिती अंमळनेर येथील भाजपा कार्यकर्त्याना मिळाली. त्यानंतर त्यांनी भारतात अंमळनेर आणि कलकत्ता या दोनच ठिकाणी मंगळग्रह देवाची मंदिरे असल्याने स्मिता वाघ यांनी उदय वाघ यांचे निवासस्थान गाठून यासंदर्भात चर्चा केली आणि त्यांच्याच सूचनेनुसार मंगळग्रह मंदिर गाठून पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत महाभिषेक केला. सुमारे दोन तास हा महाभिषेक सुरू होता. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देखील यावेळी उपस्थिती दिली.
दरम्यान, लाखो कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीस यांच्या पाठीशी असून याच भावनांचे फलित म्हणून लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटून फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा विश्वास स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे.