नाराज नाही, पक्षासोबत! तानाजी सावंत शिवसेना आमदारांच्या बैठकीला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (9 फेब्रुवारी) सह्याद्री अतिथी गृहावर बैठक (Tanaji Sawant attend shivsena meeting) आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (9 फेब्रुवारी) सह्याद्री अतिथी गृहावर बैठक (Tanaji Sawant attend shivsena meeting) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी शिवसेना आमदार आणि पदाधिकारीही सह्याद्रीवर येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत माजी मंत्री तानाजी सावंतही (Tanaji Sawant attend shivsena meeting) उपस्थित राहिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
तानाजी सावंत बैठकीला उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच त्यांनी मागे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कामं केलं होते. त्यामुळे सावंत यांना पक्षातून काढले जाईल अशी शक्यता होती. तसेच सावंत यांनीही अनेकदा शिवसेनेवर नाराजी दर्शवल्याने ते पक्ष सोडणार, अशीही चर्चा सुरु होती.
“मी नाराज नाही. पूर्णपणे पक्षासोबत आहे. माझे मुद्दे मी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांकडे मांडले आहेत. त्यावर निराकरण होईल”, असं तानाजी सावंत यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी सावंतांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली होती. सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्यात जयवंतराव प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी तानाजी सावंत ‘मातोश्री’ वर दाखल झाले होते.
दरम्यान, आज आयोजित केलेल्या बैठकीत सर्व आमदार हळूहळू सह्याद्री अतिथी येथे येत आहेत. या बैठकीत आमदार रमेश कोरगावकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि अंबादास दानवेही उपस्थित होते.