शिवसेनेचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? फडणवीसांच्या भेटीसाठी अर्धा तास घुटमळ!

आज तानाजी सावंत यांची फडणवीसांच्या भेटीसाठी चांगलीच घुटमळ झाल्याचं पाहायला मिळालं. सांवंत यांची भाजपशी वाढती जवळीक पाहायला मिळत आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्तीनंतर तानाजी सावंत यांनी फडणवीसांची धावती भेट घेतल्याचं चित्र विधानभवन परिसरात पाहायला मिळालं.

शिवसेनेचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? फडणवीसांच्या भेटीसाठी अर्धा तास घुटमळ!
तानाजी सावंत (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 7:17 PM

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. अशावेळी शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्ती केली जातेय. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी आज तानाजी सावंतांची चांगलीच घुटमळ झाल्याचं पाहायला मिळालं.

तानाजी सावंत हे युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री राहिलेले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. अशावेळी आज तानाजी सावंत यांची फडणवीसांच्या भेटीसाठी चांगलीच घुटमळ झाल्याचं पाहायला मिळालं. सांवंत यांची भाजपशी वाढती जवळीक पाहायला मिळत आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्तीनंतर तानाजी सावंत यांनी फडणवीसांची धावती भेट घेतल्याचं चित्र विधानभवन परिसरात पाहायला मिळालं. पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर सावंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. दरम्यान, स्वत:च्या साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन ही भेट झाल्याचं सावंतांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

तानाजी सावंतांची शिवसेना खासदारासोबत खडाजंगी

उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. सावंत यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर यांना चांगलेच धारेवर धरले. या बैठकीत समान निधी वाटप, अखर्चित निधी, प्रशासकीय मान्यता न घेता महावितरण विभागाने केलेली 5 कोटींची कामे, यासह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्यावर आवाज उठवल्याने चांगलीच खडाजंगी झाली. आमदार सावंत यांच्या या पावित्र्याने खासदार आणि पालकमंत्र्यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

महावितरणची 5 कोटी रुपयांची कामे प्रशासकीय मान्यता न घेता केल्याने त्याचे बिल अदा करू नये, असा पवित्रा सावंत यांनी घेतला. त्या बिलाच्या मुद्यावरून खासदार ओमराजे आणि सावंत यांच्यात चांगलीच जुंपली. महावितरणची कामे कुणी केली? ठेकेदार कोण? यासह अन्य मुद्दे यावेळी चर्चेले गेले. त्यावर कामे तुम्हीच करा? तुम्हीच ठरवा? असे सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना सुनावले होते.

इतर बातम्या :

Devendra Fadnavis : ‘सरकार घाबरलेलं, स्वत:च्या आमदारांवरही त्यांचा विश्वास नाही’, विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात

‘भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळंच मी रडारवर’, माफीनंतर भास्कर जाधवांची भाजपवर टीका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.