Bhandara ShivSainik : आमदार गुवाहाटीत, जनता मतदारसंघात, भंडाऱ्यात गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेश डहारे म्हणाले, भंडाऱ्याचे आमदार पाच वर्षांपूर्वी काही नसताना निवडून आणलं होतं. तेव्हा ते शिवसेनेचे होते. आता अपक्ष आहेत. तरीपण उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे सर्व शिवसैनिकांनी नरेंद्र भोंडेकर यांना निवडून दिले. शिवसेनेच्या सर्व संघटनांनी त्यांच्यासाठी काम केलं आहे. पण, ते आता प्रलोभनाला बळी पडून गुवाहाटीला गेले.
भंडारा : बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना एकत्र झाली आहे. यवतमाळ, नागपूर पाठोपाठ भंडाऱ्यातही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आज शिवसैनिकांनी आंदोलन केलं. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) हे शिवसेनेच्या समर्थनामुळं निवडून आले होते. शिवाय तत्पूर्वी ते शिवसेनेकडूनही निवडून आले होते. महिला आणि युवासेनेचे (Yuvasena) कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झालेत. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात हे आंदोलक एकत्र झाले. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नीलेश धुमाळ (Nilesh Dhumal) म्हणाले, गेल्या आवड्यात काही आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी गुवाहाटीला गेलेत. कुणी भीतीपोटी, तर कोणी दुसऱ्याच्या ऐकण्यावरून गुवाहाटीचा रस्ता धरला. आमदार तिथं गेले असले, तरी जनता मतदारसंघात आहे. जनतेने बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोकडं पाहून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेचा उमेदवार निवडून दिला. रामचंद्राच्या धनुष्यबाणावर मतदान केलं. मतदार मतदार संघात आहे. शिवसैनिक जागेवर आहेत. आमदार तिथं आहेत. बंडखोरांना येणाऱ्या काळात निवडणुकीत धोबीपछाड केले जाणार आहे. त्यांना निवडणुकीत पाडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही.
आदित्य ठाकरेंच्या आवाहनानंतर युवा सेनाही रस्त्यावर
युवासेना मुंबईत आक्रमक झाली आहे. भंडाऱ्यातही बंडखोर आमदारांना त्यांची जागा दाखवून दिली जाणार आहे. भंडाऱ्याचे आमदार हे अपक्ष असले, तरी शिवसेना समर्पित आमदार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आवाहनानुसार, बंडखोर आमदारांना त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न करू, असं युवासेनेचे पदाधिकारी म्हणताहेत.
गद्दारांना त्यांची जागा शिवसैनिक दाखवतील
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेश डहारे म्हणाले, भंडाऱ्याचे आमदार पाच वर्षांपूर्वी काही नसताना निवडून आणलं होतं. तेव्हा ते शिवसेनेचे होते. आता अपक्ष आहेत. तरीपण उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे सर्व शिवसैनिकांनी नरेंद्र भोंडेकर यांना निवडून दिले. शिवसेनेच्या सर्व संघटनांनी त्यांच्यासाठी काम केलं आहे. पण, ते आता प्रलोभनाला बळी पडून गुवाहाटीला गेले. त्यामुळं आम्ही त्यांना गद्दार समजतो. गद्दारांची जागा शिवसैनिक दाखवून देतील.