MLC Election 2022: मोठी बातमी : भाजपच्या दोन मतदानांवर काँग्रेसचा आक्षेप, जगताप, मुक्ता टिळकांचं मतदान बाद होणार?

महाविकास आघाडीकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आलाय. गुप्त मतदान पद्धती असताना लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा दावा महाविकास आघाडीकडून घेण्यात आलाय.

MLC Election 2022: मोठी बातमी : भाजपच्या दोन मतदानांवर काँग्रेसचा आक्षेप, जगताप, मुक्ता टिळकांचं मतदान बाद होणार?
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 4:56 PM

मुंबई : राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) मतमोजणीही लांबणार का? असा सवाल आता विचारला जातोय. कारण महाविकास आघाडीकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आलाय. गुप्त मतदान पद्धती असताना लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा दावा महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) घेण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणते लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघेही दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत. अशास्थितीतही ते राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबईत आल आहेत. आता विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीलाही उशीर लागणार का? निवडणूक आयोग काय निर्णय देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

असंवेदनशिलतेचा कळस – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीने आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसनं घेतलेला आक्षेप असंवेदनशिलतेचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. हे दोन्ही आमदार आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून मतपत्रिका पेटीत टाकली, असं फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीचं खालच्या स्तराचं राजकारण- भाजप

दीर्घ आजाराने ग्रस्त असूनही आपला मताचा अधिकार बजावण्यासाठी हे दोन्ही बहाद्दर आमदार मतदान करण्यासाठी पुण्याहून मुंबईला आले होते. दुर्दैवानं एक निम्न स्तराचं आणि घाणेरडं राजकारण महाविकास आघाडी करत आहे. त्यांनी आक्षेप जरी घेतलेला असला तरी निवडणूक आयोगाकडून पूर्व परवानगी घेऊनच हे मतदान झालेलं असल्यामुळे त्यांचा हा आक्षेप फेटाळला जाईल. परंतु यातून त्यांनी त्यांची असंवेदनशिलता, घाणेरडी वृत्ती महाराष्ट्राला दाखवली आहे, अशी टीका भाजप आमदार संजय कुटे यांनी महाविकास आघाडीवर केलीय.

काँग्रेसची भूमिका काय?

दरम्यान, राज्यसभेला या दोन्ही आमदारांनी स्वत: मतदान केलं होतं. आता त्यांनी सही स्वत: केली आणि मतपत्रिका दुसऱ्याच्या हातून मतपेटीत टाकली. दहा दिवसांत असा काय फरक पडला? असा सवाल काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.