MLC Election : नागपूरमध्ये काँग्रेसच्या अडचणीत वाढ, बसपा पाठोपाठ एमआयएमच्या निर्णयानं टेन्शन वाढलं
बसपा पाठोपाठ ‘एमआयएम’चाही नागपूर विधानपरिषद निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. बसपा आणि एमआयएमच्या निर्णयामुळं काँग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत.
नागपूर: राज्यातील विधानपरिषद निवडणुकांची (Maharashtra Vidhan Parishad Election) रणधुमाळी सुरु आहे. नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर (Dr Ravindra Bhoyar aka Chhotu Bhoyar) यांना काँग्रेसकडून (Congress) तिकीट देण्यात आले. बसपा पाठोपाठ ‘एमआयएम’चाही नागपूर विधानपरिषद निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. बसपा आणि एमआयएमच्या निर्णयामुळं काँग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत.
एमआयएमच्या बहिष्काराचं नेमकं कारण काय?
काँग्रेसने संघाचा उमेदवार आयात केल्याने ‘एमआयएम’नं विधानपरिषद निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं एमआयएमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शकीबुर रेहमान यांनी सांगितलं आहे. ‘काँग्रेसच्या मंचावर छोटू भोयर संघाचं कौतुक करतात आणि काँग्रेस नेते गप्प आहेत’ असं देखील शकीबुर रेहमान म्हणाले. ‘संघाचा उमेदवार आयात केल्याने काँग्रेसला मतदान न करता बहिष्काराचा निर्णय’ घेतल्याचं त्यांनी सांगितलं. बसपा पाठोपाठ ‘एमआयएम’च्या बहिष्काराने काँग्रेस उमेदवाराला मोठा फटका बसणार असं चित्र निर्माण झालं आहे.
बसपाचा तटस्थ राहण्याचा निर्णय
विधान परिषद निवडणुकीत बसपानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे वर्सेस छोटू भोयर यांच्यात लढत होईल. बसपा तटस्थ राहणार असल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. आमच्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही उमेदवार सारखेच असल्याचं बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे यांनी सांगितलं.
कोण आहेत छोटू भोयर
छोटू भोयर हे 1987 पासून भाजपसाठी काम करत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी भाजपचं काम सुरू केलं होतं. छोटू भोयर हे गेल्या 34 वर्षांपासून भाजपमध्ये होते. छोटू भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक होते. 20 वर्षे ते नगरसेवक राहिलेत. नागपूरचे उपमहापौरपदही त्यांनी भूषवले होते. छोटू भोयर यांनी नागपूर महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदही सांभाळलं आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक सुद्धा आहेत. नागपूर सुधार प्रन्यासचे ते विश्वस्तही होते.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा दिनाक: 23 नोव्हेंबर अर्जांची छाननी: 24 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत: 26 नोव्हेंबर मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4) मतमोजणी : 14 डिसेंबर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक: 16 नोव्हेंबर
इतर बातम्या:
MLC Election Nagpur After BSP AIMIM also boycott may be increase problems to Congress Candidate Chhotu Bhoyar