MLC Election| विधान परिषदेत MIM चं एक मत काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंना! उद्या मुंबईत अंतिम निर्णय होणार

मयआएमने एक मत काँग्रेसला द्यायचं ठरवलेलं असेल तर दुसरं मत कुणाला जाईल, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. काँग्रेसच्याच भाई जगताप यांना हे मत जाईल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. याबाबत अंतिम निर्णय उद्याच्या बैठकीतच होईल, असं खासदार जलील यांनी सांगितलं.

MLC Election| विधान परिषदेत MIM चं एक मत काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंना! उद्या मुंबईत अंतिम निर्णय होणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 2:12 PM

मुंबईः येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीचा (MLC Election) आखाडा रंगणार आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपतर्फे सर्वच आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानिमित्त मुंबईत सध्या हायप्रोफाइल ड्रामा सुरु आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काँग्रेसविरुद्ध भाजपा अशी अंतिम लढत होण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, एमआयएमच्या (MIM) दोन आमदारांपैकी एका आमदाराचं मत काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांना दिलं जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीच ही माहिती दिली आहे. आज एमआयएमच्या दोन आमदार आणि खासदार जलील यांची बैठक औरंगाबादमध्ये झाली. या बैठकीत एक मत हांडोरेंना दिलं जाणार असल्याचं निश्चित झालं. मात्र यासंबंधीचा अंतिम निर्णय उद्या होणाऱ्या मुंबईतील बैठकीनंतर कळवला जाईल, असंही खासदार जलील म्हणाले.

‘दलित समाजासाठी हांडोरेंचं काम मोठं’

विधान परिषदेत काँग्रेसने एक उमेदवार मागे न घेतल्यामुळे आणि भाजपने पाचवा उमेदवार उभा केल्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होईल. त्यामुळे एमआयएमच्या एका आमदाराचं मत काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांना देणार असल्याचं खा. जलील यांनी सांगितलं. चंद्रकांत हांडोरे यांनी दलित समाजासाठी मोठं केलं असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

एमआयएमचं दुसरं मत कुणाला?

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीतही प्रत्येक आमदाराच्या मताला मोठं मूल्य प्राप्त झालेलं असतं. अशा वेळी मोठ्या पक्षांपेक्षाही लहान पक्ष आणि अपक्षांच्या मताला मोठी किंमत असते. एमयआएमने एक मत काँग्रेसला द्यायचं ठरवलेलं असेल तर दुसरं मत कुणाला जाईल, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. काँग्रेसच्याच भाई जगताप यांना हे मत जाईल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. याबाबत अंतिम निर्णय उद्याच्या बैठकीतच होईल, असं खासदार जलील यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राज्यसभेत एमआयएमचं मत कुणाला?

राज्यसभा निवडणुकीत कुणाला मत देणार, याचा निर्णय एमआयएमने अखेरपर्यंत गुलदस्त्यात ठेवला होता. खुद्द एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही शिवसेनेला प्रस्ताव दिला होता. तुम्ही जाहीर पाठिंबा मागितला तर आम्ही मत द्यायला तयार आहोत, अशी भूमिका एमआयएमने घेतली होती. अखेर मतदानाच्या दिवशी सकाळी मात्र आपण महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचं एमआयएमनं घोषित केलं. तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार अर्थात शिवसेनेचा उमेदवार संजय जाधव यांचा पराभव झाला. आता विधान परिषद निवडणुकीतही एमआयएमच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.