MLC Election Results 2022: शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकले, सचिन अहिर, आमशा पाडवींचा भगवा फडकला, राज्यसभेचा कडता काढला

मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. या अटीतटीच्या लढाईत शिवसेनेच्या दोन शिलेदारांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. शिवसेने (Shivsena)चे दोन्ही उमेदवार सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) यांचा भगवा फडकला आहे. दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची 52 मते मिळाली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी […]

MLC Election Results 2022: शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकले, सचिन अहिर, आमशा पाडवींचा भगवा फडकला, राज्यसभेचा कडता काढला
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 10:46 PM

मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. या अटीतटीच्या लढाईत शिवसेनेच्या दोन शिलेदारांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. शिवसेने (Shivsena)चे दोन्ही उमेदवार सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) यांचा भगवा फडकला आहे. दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची 52 मते मिळाली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार उभे असल्याने या निवडणुकीत रंगत पहायला मिळाली. या निवडणुकीसाठी 285 मतदारांनी मतदान केले. मात्र दोन आमदारांची मते बाद झाल्याने 283 आमदारांच्या मतांची मजमोजणी झाली. यामध्ये सचिन अहिर यांना 26 मते तर आमशा पाडवी यांनाही 26 मते मिळवून त्यांचा विजय झाला आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by tv9 marathi (@tv9marathilive)

विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेने पहिल्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 35 तर दुसऱ्या उमेदवाराला 29 मतं दिली, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेकडे 55 मते होती. दोन्ही उमदेवारांना मतदान केल्यानंतर शिवसेनेची हक्काची तीन मते अतिरिक्त होती. शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते होती.

अहिरांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी तर पाडवींच्या समर्थानार्थ आदिवासी नृत्य

निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच सचिन अहिर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ विधान भवनाबाहेर घोषणाबाजी केली. सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है. कोण कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. सचिन भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा लगातार कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. आमशा पाडवी यांच्या समर्थनार्थ विधान भवन परिसरात आदिवासींचं पारंपरिक नृत्य सादर करण्यात आलं. आमशा पाडवी यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत हा जल्लोष करण्यात आला होता.

कुणाला किती मतं पडली ?

सचिनअहिर – 26 मते आमशा पाडवी – 26 मते रामराजे नाईक निंबाळकर – 26 मते एकनाथ खडसे – 27 मते प्रवीण दरेकर – 29 मते राम शिंदे – 30 मते श्रीकांत भारतीय – 30 मते उमा खापरे – 26 मते प्रसाद लाड – 28 मते भाई जगताप – 26

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.