मनसेचा मुंबईतील पहिला उमेदवार ठरला, घोषणा होताच म्हणाला “राज ठाकरेंनी…”

विधानसभा निवडणुकीला फक्त काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

मनसेचा मुंबईतील पहिला उमेदवार ठरला, घोषणा होताच म्हणाला राज ठाकरेंनी...
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 2:27 PM

MNS Bala Nandgaokar First Reaction : येत्या विधानसभा निवडणुकीला फक्त काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसघांतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तर पंढरपुरातील दिलीप धोत्रे यांना विधानसभेसाठीची उमेदवारी दिली जाणार आहे. विधानसभेची उमेदवारी जाहीर होताच आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया

बाळा नांदगावकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय भावना आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केले. मला पक्षाने उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार. यंदा शिवडीची जनता आपला माणूस विधानसभेमध्ये पाठवेल. यंदा राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवारीचा शिवडीची जनता नक्की विचार करेल. तसेच मी कार्यकर्त्यांच्या बळावर यंदा निवडणुकीला सामोरी जाईन, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले.

“ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही”

यावेळी बाळा नांदगावकरांनी संजय राऊतांवरही टीका केली. “संजय राऊत विसरलेत की राज ठाकरेंनी त्यांना सामनामध्ये नोकरी लावली. ते ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक असले तरी त्यांनी ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही. हे त्यांना कितपत शोभते माहिती नाही”, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

“भाषेचा स्तर सुधारा”

“सध्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने भाषेचा स्तर घसरला आहे. तो अजिबात योग्य नाही. यामुळे माझी आमदारांना विनंती आहे की भाषेचा स्तर सुधारा. तसेच मराठवाड्यात जातीय द्वेष निर्माण झाला असला तरी तो दूर होईल. त्यामुळे मराठवाडा काल जसा होता, तसाच पुन्हा निर्माण होईल”, असेही बाळा नांदगावकरांनी म्हटले.

बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी अशी होणार लढत

दरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे मुंबईतील 36 विधानसभा जागा लढवणार असल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मुंबईतील पहिला उमेदवार जाहीर केला आहे मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसघांतून बाळा नांदगावकर यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी अशी लढत होणार आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.