Sanjay Raut : मनसेच काय ते एमआयएममध्येही जाऊ शकतात, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला
आता सत्तेचा दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गट हा कोणत्याही पक्षामध्ये सामील होऊ शकतो. याबद्दल संजय राऊत यांनी हा गट आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही स्थराला जाऊ शकतो असे सांगितले आहे. त्यांच्याकडे मनसे, समाजवादी पक्ष, प्रहार संघटना यासह इतर पर्याय असतील पण त्यांना ज्या शिवसेनेने जन्म दिला त्याचाच विसर पडला आहे.
मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील इतर आमदारांनी बंड करताच हा गट (BJP) भाजपात विलिन होणार अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र, दिवसेंदिवस राजकीय घडामोडी वेगळे वळण घेत असल्याचे चित्र राज्यात आहे. गेल्या दोन दिवसांपासून आता शिंदे गट आपली आमदारकी वाचवण्यासाठी प्रहार, भाजपा नाहीतर मनसे पक्षात विलिन होईल अशी शंकाही उपस्थित केली जात होती. मात्र, या सर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. वेळ पडली तर आमदारकी वाचवण्यासाठी शिंदे गट हा (MIM) एमआयएममध्येही सामील होऊ शकतो असे म्हटले आहे. म्हणजेच हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन वेगळा गट कोणत्या स्थराला जाऊ शकतो हे राऊतांना सांगायचे होते.
शिवसेनेने जन्म दिला मात्र, त्याचाच विसर
आता सत्तेचा दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गट हा कोणत्याही पक्षामध्ये सामील होऊ शकतो. याबद्दल संजय राऊत यांनी हा गट आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही स्थराला जाऊ शकतो असे सांगितले आहे. त्यांच्याकडे मनसे, समाजवादी पक्ष, प्रहार संघटना यासह इतर पर्याय असतील पण त्यांना ज्या शिवसेनेने जन्म दिला त्याचाच विसर पडला आहे. त्यामुळे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्याशी किती प्रमाणिक राहिले याचा दाखलाही दिला. त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नसल्याचे सांगितले.
कोणकोणत्या पक्षात शिंदे गट सामील होण्याची चर्चा?
शिवसेनेतून बंडखोरी करीत आमदारांनी स्वतंत्र असा शिंदे गट तयार केला आहे. मात्र, या गटातील आमदारांना आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी कुण्यातरी पक्षात सामील व्हावे लागणार आहे. त्याच अनुशंगाने सुरवातीला हा गट प्रहारमध्ये किंवा भाजपा पक्षात सामील होण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर मनसेचे हिंदुत्व आणि एकनाथ गटाचा उद्देश एकच असल्याने हा गट मनसेमध्ये सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले होते. पण आपली आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी हा गट एमआयएममध्येही सामील होऊ शकतो असा टोला राऊतांनी लगावला आहे.
कुणाच्याही भावना दुखावल्या नाहीत
बंडखोर आमदारांबद्दल प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात होता. यावर आपण कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत. बंडखोरांचा बाप काढत भावना दुखावल्याचा आरोप माझ्यावर होत असला तरी याची सुरवात गुलाबराव पाटील यांनी सुरु केल्याचे सांगितले. त्यामुळे ही भाषा आपली नाही तर बंडखोर आमदारांचीच आहे. आतापर्यंत बंडखोरांना समावून घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, बंडानंतर सात दिवसांनी हा शिंदे गट सरकारमधून बाहेर पडला आहे.