आशिष शेलार एक तास ‘कृष्णकुंज’वर, 20 दिवसांत चौथ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला
मनसे-भाजप जवळीक वाढत असताना राज ठाकरे-शेलार यांच्यात बैठकांचे एकामागोमाग सत्र सुरु आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते (Raj Thackeray-Ashish Shelar Meet) आशिष शेलार यांच्यात पुन्हा खलबतं सुरु आहेत. आशिष शेलार हे आज सकाळी एक तास ‘कृष्णकुंज’वर (KrushnaKunj) असल्याची माहिती आहे. आशिष शेलार हे आज सकाळी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत ‘कृष्णकुंज’वर होते.
गेल्या 20 दिवसांत आशिष शेलार हे चौथ्यांदा (Raj Thackeray-Ashish Shelar Meet) राज ठाकरे यांच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर पोहोचले. त्यामुळे राजकीय गल्लीबोळांत मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाणं आलं आहे.
हेही वाचा : मिलिंद एकबोटे-राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात…
मनसे-भाजप जवळीक वाढत असताना राज ठाकरे-शेलार यांच्यात बैठकांचे एकामागोमाग सत्र सुरु आहे. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीची समीकरणं जुळवण्यासाठी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात अनेकदा चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे.
यापूर्वी तीनवेळा आशिष शेलार यांनी ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बराच काळ चर्चा झाली होती. मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावर वाटचाल सुरु केल्यानं भाजपशी जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेच्या मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चाच्या बरोबर आधी आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट
मागील काळात 7 जानेवारीला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Devendra Fadnavis meet Raj Thackeray) यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली होती. प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये जवळपास तास- दीड तास ही भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे हॉटेलच्या मागच्या गेटने बाहेर पडले. ही भेट अत्यंत गोपनीय होती. जवळपास 1 ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र (Raj Thackeray-Ashish Shelar Meet) गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.
संबंधित बातम्या
मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत, शॅडो कॅबिनेट जाहीर होण्याची शक्यता
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत
आधी स्वत: देवेंद्र फडणवीस, आता आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला
स्पेशल रिपोर्ट: राज ठाकरेंच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीचा अर्थ काय?