दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

ही पोरं तर लहान आहेत, कुठून अभ्यास करणार, कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray 10th 12th Students)

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
राज ठाकरे, उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 06, 2021 | 12:03 PM

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता पास करा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी काल चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सूचनांविषयी राज ठाकरेंनी सांगितलं. (MNS Chief Raj Thackeray demands CM Uddhav Thackeray to Promote 10th 12th Students)

शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या किंवा काहीही करा. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, माहिती नाहीत. ही पोरं तर लहान आहेत, कुठून अभ्यास करणार, कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.

आखूड शिंगी, बहुदुधी गाय मिळणार नाही

तुम्हाला आखूड शिंगी, बहुदुधी, कमी चारा खाणारी गाय मिळणार नाही. आता ट्यूशनच्या फी बघायच्या, की मुलांच्या मनावर झालेला परिणाम बघायचा, मग त्यावर बोंबा मारणार, असं राज ठाकरे म्हणाले.

एमपीएससी विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त

एमपीएसी परीक्षा कितीवेळा पुढे ढकलल्या. लक्ष कशावर द्यायचं, मलाही कळेना. मुलांची वयं वाढत आहेत, तसे ते परीक्षा देऊ शकणार नाहीत. कोणाकडे याचे उत्तर आहे माहिती नाही. मात्र सध्या दोन्ही सरकारने आरोग्यावर लक्ष द्यावं, असंही राज ठाकरेंनी सुचवलं

या कारणाने कोरोना वाढला

बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले.

राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतंय कोण जातंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे, असंही ते म्हणाले. (MNS Chief Raj Thackeray demands CM Uddhav Thackeray to Promote 10th 12th Students)

 

संबंधित बातम्या –

किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी

महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं!

(MNS Chief Raj Thackeray demands CM Uddhav Thackeray to Promote 10th 12th Students)