Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेचा हुकमी एक्का मैदानात उतरणार; राज ठाकरे पदवीधर निवडणुकीसाठी प्रचार करणार?

राज्यातील तरुणांमध्ये राज ठाकरे खूपच लोकप्रिय आहेत. त्यांच्या सभांसाठी तरुणवर्ग नेहमीच मोठ्याप्रमाणावर गर्दी करतो. | MNS chief Raj Thackeray

मनसेचा हुकमी एक्का मैदानात उतरणार; राज ठाकरे पदवीधर निवडणुकीसाठी प्रचार करणार?
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 9:27 AM

पुणे: राज्यातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) प्रचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी रुपाली पाटील-ठोंबरे तर शिक्षक मतदारसंघासाठी विद्याधर मानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन्ही मतदारसंघातील घडामोडींवर स्वत: लक्ष ठेवून असल्याचे समजते. (Raj Thackeray may take rally in Pune)

राज्यातील तरुणांमध्ये राज ठाकरे खूपच लोकप्रिय आहेत. त्यांच्या सभांसाठी तरुणवर्ग नेहमीच मोठ्याप्रमाणावर गर्दी करतो. त्यामुळे पदवधीर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेला याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळेच राज ठाकरे यांच्याकडून शुक्रवारी पुण्यात मेळावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

‘मनसे’मुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील चुरस वाढण्याची शक्यता मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेल्या रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.

त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम LLB झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत. त्यामुळे आता रुपाली पाटील-ठोंबरे पदवीधर मतदारांना साद घालण्यात कितपत यशस्वी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्याने मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.

संबंधित बातम्या:

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढणारे अभिजित बिचुकले आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांतदादा मैदानात, सांगलीत चक्क शिवसेना जिल्हाप्रमुखाशी गुप्त चर्चा

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

(Raj Thackeray may take rally in Pune)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.