मला थेट संपर्क करा, शॅडो कॅबिनेटमध्ये वर्णी लावतो, राज ठाकरेंची खुली ऑफर
ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत, परस्पर पत्रकार परिषदा घ्यायच्या नाहीत, अशी तंबीही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. Raj Thackeray offer on Shadow Cabinet
मुंबई : तुम्ही पक्षाचे पदाधिकारी नसलात, पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल, तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा, मी तुम्हाला ‘शॅडो कॅबिनेट’ अर्थात प्रतिरुप मंत्रिमंडळाच्या कामात सहभागी करुन घेईन, असा खुला प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मनसेच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबईत आयोजित सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. (Raj Thackeray offer on Shadow Cabinet)
महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत, तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा, अशा सूचनाही राज ठाकरेंनी दिल्या. शॅडो कॅबिनेटच्या प्रयोगाला यश येईल याची खात्रीही राज ठाकरेंनी व्यक्त केली.
हे पैसे मिळवण्याचं काम नाही, ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत, परस्पर पत्रकार परिषदा घ्यायच्या नाहीत, मला विचारल्याशिवाय पुढील निर्णय घ्यायचे नाहीत, विश्वासातले असले, तरी त्यांना सूचना दिलेल्या आहेत, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
LIVETV | गेल्या 14 वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस मतदार कुठे जातात हे कळत नाही. लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार याला काय अर्थ आहे? : राज ठाकरे https://t.co/ImprYhMJl7 @mnsadhikrut pic.twitter.com/z7ydA2DCcN
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2020
मनसे शॅडो कॅबिनेट
गृह विधी व न्याय, जलसंपदा आणि सामान्य विभाग – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजीव उबंरकर, प्रवीण कदम, योगेश खैरे, प्रसाद सरफरे, दिपक शर्मा,
जलसंपदा – अनिल शिदोरे
मराठी भाषा – अमित ठाकरे, अनिल चौपडे
वित्त आणि गृहनिर्माण – नितीन सरदेसाई,
महसूल – अनिल अभ्यंकर, दिलीप कदम, संदीप पाचंगे,
ऊर्जा – शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे,
ग्रामविकास – जयप्रकाश बावीस्कर, अमित ठाकरे, अनिल शिदोरे,
वने, आपत्ती व्यवस्थापन – संजय चित्रे, अमित ठाकरे, संतोष धुरी, आदित्य दामले.
शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर – उच्चशिक्षण, सुधाकर तांबोळी, अमोल रेगे,
(Raj Thackeray offer on Shadow Cabinet)
कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे
नगरविकास आणि पर्यटन- संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरोले, हेमंत कदम, योगेश चिले,
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता, कुंदा राणे
सहकार आणि पणन – दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये,
अन्न व नागरी पुरवठा – राजा चौगुले, विशाल पिंगळे
मत्स्यविकास आणि बंदरे – परशुराम
महिला व बालविकास – शालिनी ठाकरे
सार्वजनिक बांधकाम- संजय शिरोडकर
रोजगार हमी आणि फलोत्पादन – बाळा शेडगे
सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर
कौशल्य विकास – स्नेहल जाधव
सामाजिक न्याय – संतोष सावंत
ग्राहक सरंक्षण – प्रमोद पाटील
अल्पसंख्याक – अल्ताफ खान, जावेद तडवी
राज ठाकरे आणखी काय म्हणाले? : 14 वर्षात सतत 13 आमदारांचे प्रश्न का? मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंचा सवाल
पाहा व्हिडीओ :
Raj Thackeray offer on Shadow Cabinet