अनिल देशमुख हा विषय महत्त्वाचा नाही, बॉम्ब कोणाच्या सांगण्यावरून ठेवला हे शोधा : राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray)  यांनी आज (6 एप्रिल) पत्रकार परिषद आयोजित केली होते. कोरोना ते परमबीर सिंहपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं.

अनिल देशमुख हा विषय महत्त्वाचा नाही, बॉम्ब कोणाच्या सांगण्यावरून ठेवला हे शोधा : राज ठाकरे
अनिल देशमुख, राज ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 12:16 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray)  यांनी आज (6 एप्रिल) पत्रकार परिषद आयोजित केली होते. कोरोना ते परमबीर सिंहपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. पत्रकारांनी त्यांना अनिल देशमुख (Anil Deshmukh) या प्रक्रणार प्रश्न विचारताच त्यांनी माध्यमांना थेट उत्तर देत म्हटले की, माझ्यासाठी अनिल देशमुख हा विषय महत्त्वाचा नाही. बॉम्ब कुणाच्या सांगण्यावरून ठेवला गेला?, याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे आहे. पोलिसांनी अर्थात वाझेंनी हे का केलं? किंवा कुणाच्या सांगण्यावरून केलं, याचा तपास झाला पाहिजे (MNS chief Raj Thackeray reaction on Anil Deshmukh resignation).

राज ठाकरे पुढे म्हणाले की, माझी आधीची पत्रकार परिषद ऐकली असेल किंवा तुम्ही त्यात असाल तर तुम्हाला माहित असेल, मी तेव्हाही बोललो होतो की यामागे कोण आहे त्याचा शोध घेणे जास्त महत्त्वाचे आहे. राज्यातील पोलीस अधिकारे असे वागतात, त्यामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. मुळात अंबानींच्या घराखाली हा बॉम्ब ठेवण्यास कोणी सांगितला, याचा तपास झाला पाहिजे.

माध्यमांनी आठवण करण्याची गरज भासावी का?

या मुद्द्यावर नजर टाकताना राज ठाकरे पत्रकार बांधवाना म्हणाले की, सध्या परिस्थिती अशी आहे की, एखादा मुद्दा चर्चिला जातो आणि काही काळानंतर चर्चा बंद झाली की याबद्दल तापास किती झाला किंवा कुठपर्यंत आला याचा विसर पडतो (MNS chief Raj Thackeray reaction on Anil Deshmukh resignation).

राज ठाकरेंनी ऐकवला किस्सा

ही परिस्थिती समजावून सांगताना राज ठाकरेंनी एक किस्सा देखील सुनवलं. ते म्हणतात, आमचे एक जवळचे मित्र आहेत, त्यांना गाणं गायला प्रचंड आवडतं. मात्र, जेव्हा ते गाण गायला बसतात तेव्हा प्रथम मोठी तान घेतात. ही ताण इतकी मोठी असते की, ते पुढचं गाणं विसरतात. माग त्यांना आठवण करून द्यावी लागते की तुम्ही, हे गाण गात होतात. आताही तसचं झालं आहे. विषय असतो एक आणि लक्ष दुसरीकडेच जात. मग, पुन्हा सांगावं लागतं की बाबा हे सुरु आहे.

या आधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. सचिन वाझेप्रकरण आणि अनिल देशमुख यांनी दिलेलं कथित 100 कोटींचं टार्गेट, या प्रकरणाची चौकशी केंद्राने करावी, राज्यात फटाक्याची माळ लागेल, असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याप्रमाणे आता हायकोर्टाने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कथित खंडणीची चौकशी सीबीआयकडे (CBI) सोपवली आहे. इतकंच नाही तर या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

(MNS chief Raj Thackeray reaction on Anil Deshmukh resignation)

संबंधित बातम्या :

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सर्वात महत्त्वाच्या सूचना नेमक्या काय?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.