‘साहेब साहेब जरा इकडे, थोडं इथं…’ आणि लालबागच्या राजाने राज ठाकरेंसोबत फोटो काढण्याची भक्तांची इच्छा पूर्ण केली!
अनेक जण राज ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडतच होते. पण राज ठाकरे थांबले. त्यांनी रुमालाने चेहरा पुसला. त्यानंतर पुन्हा चश्मा लावला. फोटोसाठी विचारलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या चिमुरड्याला राज ठाकरे यांच्या पत्नीने उचलून घेतलं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray at Lalbaug Cha Raja) यांनी पत्नीसह मुंबईतील गणेश मंडळांना (Mumbai Famous Ganpati Mandal) सलग दुसऱ्या दिवशीही भेट दिली. परेलपासून सुरुवात करत ‘मुंबईचा राजा’चं दर्शन घेत ते लालबागच्या राजापर्यंत पोहोचले. इथं पोहोचल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray News) लालबागच्या राजाच्या चरणी डोकं टेकलं. त्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांसोबत थोडी बातचीत केली आणि लगेचच मार्गस्थ झाले. पण यावेळी बाहेर येताना राज ठाकरेंसोबत फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी चाहत्यांची सेल्फीची इच्छा पूर्ण होईल, याची पुरेपूर काळजी घेतली.
राज ठाकरे लालबागच्या राजाच्या मंडपातून जेव्हा बाहेर पडू लागले, तेव्हा सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांसोबत आधी त्यांनी हसत खेळत बातचीत केली. यावेळी लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांनी एक मानवी साखळी तयार केली होती. मध्येच कुणी शिरु नये आणि व्हिआयपी लोकांना बाहेर पडताना कोणताही अडथळा नको यायला, म्हणून नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक आणि पोलीस अशा सगळ्यांनी मिळूनच नियोजन केलेलं असतं. यावेळीही तेच पाहायला मिळालं. सुरुवातीला राज ठाकरे यांनी एका पोलिसासोबत शेकहॅन्ड केलं आणि नंतर ते पुढे चालू लागले.
दरम्यान, यावेळी एका तरुणाने सेल्फीसाठी राज ठाकरेंनी विनंती केली. राज ठाकरेंनीही ती मान्य केली. मग हात जोडलेल्या अवस्थेत तरुण समोर पाहत असताना राज ठाकरेंनी त्याला कॅमेऱ्यात पाहण्यासाठी सांगितलं आणि सेल्फीऐवजी दुसऱ्या एका व्यक्तीने राज ठाकरेंसोबत फोटो काढण्याची या तरुणाची इच्छा पूर्ण केली. यानंतर लालबागच्या राजा मंडपाच ड्युटीवर असणाऱ्या एका सुरक्षा रक्षक जवानाने राज ठाकरेंसोबत सेल्फी काढला.
यानंतर बाहेर निघत असताना एक चिमुरड्यासह असलेल्या एका व्यक्तीनेही राज ठाकरेंसोबत फोटो काढण्याची इच्छा बोलून दाखवली. असे अनेक जण राज ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडतच होते. पण राज ठाकरे थांबले. त्यांनी रुमालाने चेहरा पुसला. त्यानंतर पुन्हा चश्मा लावला.
फोटोसाठी विचारलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या चिमुरड्याला राज ठाकरे यांच्या पत्नीने उचलून घेतलं. त्यानंतर राज ठाकरेंनी पोझ देत लालबागच्या राजाला दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्ताची सोबत फोटो काढण्याची इच्छा पूर्ण केली. यानंतर राज ठाकरे पुढे पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले.
पाहा संपूर्ण व्हिडीओ :
शनिवारपासूनच राज ठाकरे यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरापासून गणेश दर्शनाचा मुंबई दौरा सुरु केलाय. सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या गणेश मंडळांच्या भेटी घेत संपर्क मोहीम अधिक घट्ट करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.