“योगी आदित्यनाथ, मग तुम्हीही लक्षात ठेवा…” राज ठाकरे यांचा थेट इशारा
यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला (Raj Thackeray warns Yogi Adityanath)
मुंबई : महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना आत येता येणार नाही, हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचं असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल, असं योगी म्हणाले होते. (Raj Thackeray warns Yogi Adityanath)
“उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील, तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल, असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल, तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं.” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला
“तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे. तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा, हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा” अशी सूचनाही राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला केली.
#महाराष्ट्रधर्म #InterStateMigrantWorkmenAct pic.twitter.com/cfWRKT8CiG
— Raj Thackeray (@RajThackeray) May 25, 2020
हेही वाचा : यूपीच्या मजुरांचा शिवसेना-काँग्रेस सरकारकडून छळ, ठाकरेंना माणुसकी क्षमा करणार नाही : योगी
उत्तर प्रदेशातील कामगारांचा शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही क्षमा करणार नाही, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले होते. महाराष्ट्र सरकारने ‘सावत्र आई’ म्हणून तरी काळजी घ्यायला हवी होती, असा टोला योगींनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला होता. (Raj Thackeray warns Yogi Adityanath)
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी ने कामगारों/श्रमिकों को सेवायोजित करने के लिए एक माइग्रेशन कमीशन गठित करने की रूपरेखा तैयार करने का निर्देश दिया है। इसके तहत इन कामगारों/श्रमिकों को रोजगार मुहैया कराकर इन्हें सामाजिक सुरक्षा की गारंटी दी जाएगी। #BJPWithMigrants
— Yogi Adityanath Office (@myogioffice) May 24, 2020
परप्रांतीय कामगारांबाबत आधीही सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. त्यावेळीही राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती.
“परप्रांतीय कामगारांना परत आल्यावर तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये. कारण त्या राज्यात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे चाचण्या होत आहे. तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही. ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. तसेच त्याच वेळी त्यांची ‘राज्य स्थलांतरित कायद्या’खाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो.” असं राज ठाकरे म्हणाले होते. (Raj Thackeray warns Yogi Adityanath)