VIDEO | “राज्यपाल असं बेताल बोलतात, पक्षातील लोकं त्यांना काही बोलत नाहीत का?”, मनसे नेते वसंत मोरे यांचा सवाल

एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यांनी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे.

VIDEO | राज्यपाल असं बेताल बोलतात, पक्षातील लोकं त्यांना काही बोलत नाहीत का?, मनसे नेते वसंत मोरे यांचा सवाल
राज्यपालांचं वय झालं, त्यांना रिटायर करा, मनसे आक्रमक; भाजपची कोंडी? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 11:42 AM

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले आहे. राज्यपालांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आता मनसेनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांचं वय झालं आहे. त्यांना तात्काळ रिटायर करा, अशी मागणी मनसेने केली आहे. विरोधकांबरोबर आता मनसेनेही राज्यपालांना हटवण्याची मागणी केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मनसेचे नेते वसंत मोरे यांनी ही मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती बेताल वक्तव्य करते. जे आपले आदर्श आहेत त्यांच्यावर बोललं जात आहे. तरीही राज्यपालांवर कारवाई का होत नाही? यांना यांच्या पक्षातले वरिष्ठ का समजावून सांगत नाहीत?, असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.

शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहेत आणि तुम्ही त्यांना एकेरी कसं बोलू शकता? मग आम्हाला देखील तुम्हाला एकेरी बोलता येतं. हे राज्यपाल नेहमी कळ लावायचं काम करतात म्हणून मी बोललो यांचं नाव बदलून कळीचा नारद ठेवा. हे कधी जातीवर बोलून भांडणे लावायचं काम करतात. तर कधी महापुरुषांवर अवमानकारक बोलतात. राज्यपालांचं वय झालं आहे त्यांना रिटायर करा, अशी मागणीही मोरे यांनी केली.

वसंत मोरे यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. मला वाटतं की राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवहरलाल नेहरू , सावरकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यावर का बोललं जातं? आपल्या हिंदू संस्कृतीत एकदा माणूस गेला की त्याच्याविषयी बोलत नाहीत. हे लोक बावळट आहेत. हे सगळे लोक बेताल व्यक्त का करत आहेत तेच कळत नाही, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो.

एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यांनी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.