मनसे फॅक्टर 23 मे रोजी कळेल : उर्मिला मातोंडकर
मुंबई: “मी लढतीचा विचार करत नाही. लढतीचा विचार लोकांनी करायचा आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोक ठरवतील, लोकांनी मतदान करावं”, असं अभिनेत्री आणि उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरने म्हटलं. टीव्ही 9 मराठीशी बोलताना उर्मिलाने लोकसभा निवडणूक मतदानाबाबत प्रतिक्रिया दिली. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोकांनी मतदान करायला हवं. गेल्या महिनाभरात लोकांच्या भेटीगाठी झाल्या, चांगला प्रतिसाद […]
मुंबई: “मी लढतीचा विचार करत नाही. लढतीचा विचार लोकांनी करायचा आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोक ठरवतील, लोकांनी मतदान करावं”, असं अभिनेत्री आणि उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरने म्हटलं. टीव्ही 9 मराठीशी बोलताना उर्मिलाने लोकसभा निवडणूक मतदानाबाबत प्रतिक्रिया दिली.
लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोकांनी मतदान करायला हवं. गेल्या महिनाभरात लोकांच्या भेटीगाठी झाल्या, चांगला प्रतिसाद मिळाला, असं उर्मिलाने सांगितलं.
निकालपर्यंत काय करणार?
लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निकालासाठी काही दिवस शिल्लक आहेत. तोपर्यंत काय करणार असा प्रश्न उर्मिलाला विचारण्यात आला. त्यावर उर्मिला म्हणाली, “जो वेळ असतो तो चांगला वापरायचा असतो”
मनसे फॅक्टर
या परिसरात मनसे फॅक्टर कसा होता असं विचारलं असता, उर्मिला म्हणाली, “बघूया आता सगळंच 23 मे रोजी कळेल”
उत्तर मुंबईतील लढत
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिली आहे. उत्तर मुंबईत नेहमीच धक्कादायक निकाल पाहायला मिळतात. एकेकीकाळी या मतदारंसघातून भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा अभिनेता गोविंदा याने पराभव केला होता. गेल्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पराभूत करत, भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी विक्रमी फरकाने विजय मिळवला होता. यंदा काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रिंगणात आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांना तोडीस तोड टक्कर आहे. उर्मिला मातोंडकरने उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यात मराठी मतं तिच्यामुळे काँग्रेसकडे वळण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
VIDEO: मी लढतीचा विचार करत नाही. लढतीचा विचार लोकांनी करायचा आहे : उर्मिला मातोंडकर @OfficialUrmila pic.twitter.com/k16wDjo520
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2019
संबंधित बातम्या
मी धर्मांतर केलेलं नाही, माझा धर्म विचारणारे हे कोण? उर्मिलाकडून टीकाकारांचा समाचार
माझ्यावर हल्ला करण्यासाठी भाजपने गुंड पाठवले : उर्मिला मातोंडकर