संजय राऊत म्हणजे कादर खान? कुणी दिली उपमा? ‘त्या’ मिमिक्रीवरून राजकारण पेटलं!
राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे असा टोला संजय राऊत यांनी लगावल्यानंतर त्यांनाच एक प्रत्युत्तर मिळालंय.
मुंबईः राजकारण म्हणजे रोज सकाळी उठून आक्रस्ताळेपणा करून कादर खानासारखा (Kadar Khan) अभिनय करणे नव्हे, असा टोमणा मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गोरेगाव येथील भाषणात काल उद्धव ठाकरे तसेच राहुल गांधी यांची नक्कल अर्थात मिमिक्री केली. त्यावरून संजय राऊत यांनी आज संतप्त प्रतिक्रिया दिली. राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे. नक्कल पहायची असल्यास आम्ही जॉनी लिव्हरची पाहू, असं वक्तव्य राऊत यांनी केलं. त्यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी उपरोक्त ट्विट केलं.
गजानन काळे काय म्हणाले?
संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना गजानन काळे यांनी ट्विट केलंय. त्यांनी लिहिलंय- राजकारण म्हणजे सकाळी उठून रोज आक्रस्ताळपणा करून ‘कादर खान’सारखा अभिनय करणे नव्हे ..
आदरणीय बाळासाहेब यांच्या भाषणाला पण काँग्रेसवाले मिमिक्रीच म्हणायचे.. आज त्यांचीच भाषा काँग्रेस – राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करणारे संजय राऊत करत आहेत. राऊतांच्या या ‘पोपटपंची’ला जनता कंटाळली आहे…
राजकारण म्हणजे सकाळी उठून रोज आक्रस्ताळपणा करून ‘कादर खान’सारखा अभिनय करणे नव्हे ..
आदरणीय बाळासाहेब यांच्या भाषणाला पण काँग्रेसवाले मिमिक्रीच म्हणायचे आज त्यांचीच भाषा काँग्रेस – राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करणारे संजय राऊत करत आहेत. राऊतांच्या या ‘पोपटपंची’ला जनता कंटाळली आहे.
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 28, 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील मनसे गटप्रमुखांच्या मेळाव्याला रविवारी संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा खास स्टाइलमध्ये समाचार घेतला. आजारी असल्यामुळे उद्धव ठाकरे कशा प्रकारे बोलत होते, याची नक्कल राज ठाकरेंनी करून दाखवली. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आवाजाचीही त्यांनी मिमिक्री केली.
राज ठाकरे यांच्या भाषणात राहुल गांधींची मिमिक्री, पाहा-
नकलांसाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे आपल्या भाषणादरम्यान नेहमीच कुणाची ना कुणाची नक्कल करत असतात. काल त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांनी नक्कल केली. त्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये संतप्त भावना आहे.