मुंबईः शिवसेना ठाकरे (Thackeray) गटाच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मनसे नेत्याने जिव्हारी लागणारी टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शिवसेनेप्रति निष्ठेवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे. मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचं नाव न घेता जहरी टीका केली आहे. महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक “सोंगाड्या” आहे जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलेलं, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.
सध्या महाप्रबोधन यात्रेद्वारे महाराष्ट्रभर भाषणांचा धडाका लावलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर मनसे नेते गजानन काळे यांनी टीका केली आहे. वक्तृत्व स्पर्धेत टाळया आणि बक्षीसं मिळावीत म्हणून “मनी म्याव”कायम भाषणं करत आली आणि त्याच सवयीचा गुलाम झाल्यामुळे वेडेवाकडे चाळे करत आता राजकारणात टिकू पाहतेय, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.
.. उष्माघाताने राहिलेली शिल्लकसेना पण जिवंत राहते की नाही या चिंतेत मातोश्रीवरचा “सोंगाड्या”आणि सैनिक असल्याचं कळतंय, अशी बोचरी टीकाही गजानन काळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक ‘सोंगाड्या’ आहे जो सकाळी भगवा,दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलंय…
वर्षभरात सोंगाड्याचा अनुभव आला की “गुळाची ढेप” मातोश्रीचा अंधार सोडून दुसऱ्या कळपात दिसली तर नवल वाटायला नको, असा दावाही मनसे नेत्याने केला आहे.
महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक “सोंगाड्या” आहे जो सकाळी भगवा,दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलंय… वर्षभरात सोंगाड्याचा अनुभव आला की “गुळाची ढेप” मातोश्रीचा अंधार सोडून दुसऱ्या कळपात दिसली तर नवल वाटायला नको…
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) December 3, 2022
सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या अचानकपणे सभा घेणे, भूमिका जाहीर करण्यावर अंधारे यांनी वक्तव्य केलं होतं.. आमच्याकडे एक तर असा पठ्ठ्या आहे. उठ दुपारी आणि घे सुपारी.. ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात.. पुढच्या निवडणुकीलाच येतात, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला होता.