सात वर्षांपूर्वी मंजूर झालेलं रुग्णालय राजकारणात अडकलं, कोरोनाबाधितांसाठी उपचाराची सोय नाही, विदर्भात मनसे आक्रमक
यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात मनसेनं सरकारविरोधात आमरण उपोषण सुरु केलं.
नागपूर : मुंबईत अनेक प्रश्नांवर मनसे आक्रमक आहेत. आता राज ठाकरे यांच्या आदेशाने विदर्भातंही (MNS Hunger Strike In Vidarbha) मनसे सरकार विरोधात आक्रमक झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात मनसेनं सरकारविरोधात आमरण उपोषण सुरु केलं.
भाजपचा गड असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात मनसे आक्रमक झाली. वणी परिसरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. पण उपचारासाठी रुग्णालय नाही, त्यामुळे 2013 साली मंजूर झालेलं उपजिल्हा रुग्णालय सुरु करा, या मागणीसाठी वणीत मनसेचं आमरण उपोषण सुरु केलं आहे.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह मनसेचे 12 पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. आज वणीत मनसेनी सरकारविरोधात मोर्चा काढत आमरण उपोषण सुरु केलं.
विदर्भातील वणीत मनसेची चांगली ताकद आहेत. त्यामुळे याच वणी परिसरात मनसे महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे.
हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमकhttps://t.co/vbeIdAGyas#HathrasRapeCase #MNS #UP #GovernmentPressure@mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 2, 2020
MNS Hunger Strike In Vidarbha
संबंधित बातम्या :