मुंबई – महाराष्ट्रातलं राजकीय नाट्य सुरू होऊन आठ दिवस पुर्ण झाले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना सोबत घेऊन सुरूवातीला बंड केलं. सुरत मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर तिथं अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने बंडखोर आमदारांचा मुक्काम गुवाहाटीतील पंचतांराकित हॉटेलमध्ये हलवला. तेव्हापासून एकमेकांवर नेते आरोप करीत आहेत. दीपाली सय्यद (Deepali Sayed) या देखील राजकीय नाट्य सुरू झाल्यापासून ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांना टोले लगावत आहेत. सय्यद यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्यात दोनदा राजकीय फोनद्वारे चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. त्यामुळे लवकरचं राज्याच्या राजकारणात नवं समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता ११ वरून १ वर आले आहेत आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते वजा नाही त्यामुळे राजकिय सल्ले घेताना हिशेब बघुन घ्या. मनचे हा पक्ष नसुन डिपॅाझिट जप्तची मशिन आहे.
हे सुद्धा वाचा— Deepali Sayed (@deepalisayed) June 27, 2022
“मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता 11 वरून 1 वर आले आहेत.आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते. वजा नाही त्यामुळे राजकिय सल्ले घेताना हिशेब बघुन घ्या. मनचे हा पक्ष नसुन डिपॅाझिट जप्तची मशिन आहे.” असा आशय दिपाली सय्यद ट्विटमध्ये लिहिला आहे. त्यामुळे त्यांचं ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आत्तापर्यंत अनेकदा सय्यद यांनी ट्विट करून विरोधकांचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरू झाल्यापासून त्यांनी अनेक ट्विट केली आहेत. यापूर्वी एका ट्विटमध्ये त्यांनी “देवा लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेल चे बिल वाढतोय, विरोधकांचा भाव वाढतोय, ED ची नोटीस लाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा!” अशा आशल लिहिला होता.
यामधून त्यांनी विरोधकांना टोला लगावला होता.