मनसेच्या किशोर शिंदेंचा निवडणूक खर्च चंद्रकांत पाटलांपेक्षा जास्त, एकूण खर्च किती?
भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा मनसे उमेदवार किशोर शिंदे यांचा निवडणूक खर्च जास्त असल्याचे नुकतंच समोर आलं (Chandrakant Patil Election Spending) आहे.
पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कोणत्या ना कारणामुळे चांगलीच (Chandrakant Patil Election Spending) रंगली. निवडणुकीनंतर आता चर्चा आहे ती निवडणूक खर्चाची. या मतदारसंघात भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा मनसे उमेदवार किशोर शिंदे यांचा निवडणूक खर्च जास्त असल्याचे नुकतंच समोर आलं (Chandrakant Patil Election Spending) आहे. यामुळे या ठिकाणी चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. कोथरुडची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली होती. निवडणुकीनंतर आता निवडणूक खर्चाची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाकडे खर्चाचा तपशील दिल्याप्रमाणे मनसे उमेदवार किशोर शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा जास्त खर्च केला आहे.
किशोर शिंदे यांनी 9 लाख 27 हजार 727 रुपये इतका खर्च केला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी 6 लाख 57 हजार 289 रुपये खर्च केल्याचे निवडणूक खर्चात म्हटले आहे. यानुसार किशोर शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा तीन लाखांपेक्षा जास्त खर्च केला. दरम्यान चंद्रकांत पाटील यांचा निवडणूक खर्च कमी असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं (Chandrakant Patil Election Spending) आहे.
चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभा आणि रॅलीवर 1 लाख 8 हजार 154 रुपये खर्च केले. तर जाहीर सभेतील मंचासाठी 48 हजार, खुर्च्यांसाठी 16 हजार, एलईडी स्क्रीन आणि साऊंड सिस्टीमसाठी 18 हजार, टी-शर्टसाठी 23 हजार आणि सोशल मीडियासाठी 19 हजार 589 रुपये खर्च करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे हा खर्च दाखवला आहे.
तर मनसेचे उमेदवार यांनी सभा आणि इतर सर्व कार्यक्रमासाठी 9 लाख 27 हजार 727 रुपये खर्च केले आहे. यावरुन सध्या कोथरुडमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रकांत पाटील कोथरुड मतदारसंघातून यांनी 25 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीने आपला उमेदवार न देता शिंदेंनाच पाठिंबा दिला (Chandrakant Patil Election Spending) होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी किशोर शिंदे यांच्यासाठी घेतलेल्या सभेतही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. आमचा किशोर ‘चंपा’ची चंपी करेल असा निशाणा राज ठाकरेंनी साधला होता. मात्र त्यांच्या सभांचा फारसा परिणाम झालेला दिसून आला नाही.
संबंधित बातम्या :
भाजपमुक्त कोल्हापूरला शिवसेना जबाबदार : चंद्रकांत पाटील
शिवसेना खासदारांनी युतीधर्म पाळला नाही : चंद्रकांत पाटील
विधानसभा निकाल 2019: विजयानंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
कोथरुडमध्ये साडीवाटप, महिलांची तुडुंब गर्दी, चंद्रकांत पाटील म्हणतात…