Maharashtra politics : राज साहेबांसोबत द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांबद्दल किंचितही सहानुभूती नाही; खोपकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या बाजुने एक सहानुभूतीची लाट निर्माण होताना दिसत आहे. मात्र राजसाहेब यांच्याबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल किंचित देखील सहानुभूती वाटत नसल्याचे खोपकर यांनी म्हटले आहे.

Maharashtra politics : राज साहेबांसोबत द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांबद्दल किंचितही सहानुभूती नाही; खोपकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
अमेय खोपकर
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 12:20 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र  पाठवून बहुमत सिद्ध करण्याचे आवाहान केले होते. आज बहुमत चाचणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यापूर्वी राज्यातील जनतेशी भावनिक संवाद साधला. या संवादानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजुने एक सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यभरातून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळत आहे. मात्र दुसरीकडे राजसाहेब (Raj Thackeray)यांच्याबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्रा सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नसल्याचे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हटलंय खोपकर यांनी?

अमेय खोपकर यांनी ट्विट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  ‘प्रत्येक प्रसंगात मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचं नुकसान करणाऱ्या, राजसाहेबांची माणसं फोडणाऱ्या, राजसाहेब यांच्याबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही’ असं ट्विट खोपकर यांनी केले आहे. दरम्यान यापूर्वी देखील त्यांनी अनेकवेळा विविध विषयांवरून शिवसेनेवर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाच्या जल्लोषावर बंडखोर नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जल्लोष सुरू असल्याचे दिसून येत आहे. ऐकोमेंकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. मात्र या जल्लोषावर बंडखोर आमदारांनी आक्षेप घेतला आहे. आमची लढाई आमच्या पक्षप्रमुखांच्या विरोधात नव्हती. विचारांसाठी होती. सत्तेसाठी आम्ही बंड केले नाही. त्यामुळे या पद्धतीचा जल्लोष चुकीचा आहे. काहीही झाले तरी उद्धव ठाकरे दुखवता कामा नये, असे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी ‘टीव्ही9’ बोलताना म्हटले आहे. तसेच प्रतिक्रिया देताना केवळ प्रवक्त्यांनीच प्रतिक्रिया द्याव्यात असे देखील त्यांनी म्हटले आहे. सत्तास्थापनेबाबतचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच घेतील असेही यावेळी केसरकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?.
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली.
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'.
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा.
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.