मनविसेत खांदेपालट, मुंबईत नवीन विभाग अध्यक्षांची नियुक्ती, अमित ठाकरेंकडून नव्या चेहऱ्यांना संधी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असून पहिल्याच टप्प्यात त्यांनी मनविसेचे 7 विभाग अध्यक्ष बदलले आहेत.

मनविसेत खांदेपालट, मुंबईत नवीन विभाग अध्यक्षांची नियुक्ती, अमित ठाकरेंकडून नव्या चेहऱ्यांना संधी
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 5:21 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray)  यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असून पहिल्याच टप्प्यात त्यांनी मनविसेचे 7 विभाग अध्यक्ष बदलले आहेत. नव्या विभाग अध्यक्ष पैकी बहुतेक जण हे मनविसेच्या (MNVS) दुसऱ्या फळीत होते, तर काही नवीन चेहऱ्यांनाही अमित यांनी पुढे आणलं आहे. काही निवडक ठिकाणी मात्र त्यांनी जुनेच विभाग अध्यक्ष कायम ठेवले आहेत. मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान मुंबईच्या सर्वच्या सर्व म्हणजे 36 विधानसभा मतदासंघामध्ये राबवण्यात येत आहे. प्रत्येक विभागात त्यांना किमान 200 नवतरुण विद्यार्थी विद्यार्थिनी भेटायला येत असून आतापर्यंत त्यांनी सुमारे 3000 हजार विद्यार्थ्यांशी वैयक्तिक तसंच गटागटाने संवाद साधला आहे.

गेल्या 7 दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मुंबईतील 15 विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयांना भेटी देऊन मनविसेचे पदाधिकारी आणि कॉलेजमधील नवीन तरुण तरुणींना प्रत्यक्ष भेटत आहेत, त्यांच्याशी थेट बोलत आहेत. या 15 विधानसभेतील मनविसेच्या 15 विभाग अध्यक्षपैकी 7 विभाग अध्यक्ष त्यांनी बदलले आहेत. 3 विभाग अध्यक्ष आधीचे कायम ठेवले आहेत, तर उर्वरित 5 विधानसभा साठीच्या नेमणुका ते पुढच्या आठवड्यात करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

अमित ठाकरे मनविसेचे अध्यक्ष झाल्यानंतर मनेसेच्या युवा आघाडीत मोठे बदल पाहायला मिळाले. नव्या दमाच्या तरुणांना मनविसेत महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या त्यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते नव्या ऊर्जेने कामाला लागले आहेत.

मनविसेचे मुंबईतील नवीन चेहरे

वरळी – वैभव मांजरेकर विभाग अध्यक्ष

मानखुर्द – प्रकाश हंगारगे विभाग अध्यक्ष

घाटकोपर पूर्व – रोहन अवघडे विभाग अध्यक्ष

घाटकोपर पश्चिम – समीर सावंत विभाग अध्यक्ष

विक्रोळी – प्रथमेश धुरी विभाग अध्यक्ष

मुलुंड – प्रवीण राऊत विभाग अध्यक्ष

भांडूप- प्रतीक वंजारे विभाग अध्यक्ष

पद कायम असलेले मनविसेचे अध्यक्ष

वडाळा – ओमकार बोरकर विभाग अध्यक्ष

मीनल सोनावणे विभाग अध्यक्ष (विद्यार्थिनी)

शिवडी – उजाला यादव विभाग अध्यक्ष

माहीम – अभिषेक पाटील विभाग अध्यक्ष

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.