Amit Thackeray teaser : अमित ठाकरे कोकण पिंजून काढणार, टीझरही आला, शिवसेनेच्या भांडणाचा लाभ मनसेला होणार?
मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी तर दौऱ्यांचा सापाटा लावला आहे. विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अमित ठाकरे सध्या पोहचत आहेत. यातच आता अमित ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या तारखा आणि टीझरही आला आहे. हा टीजर प्रत्येक मनसैनिकाला हुरूप भरवणारा आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडले आहेत. याचा फटका हा शिवसेनेच्या दोन्ही गटांना बसणार आहे. शिवाय काही दिवसातच राज्यात पालिका निवडणुका लागत आहे. तसेच काही नगरपचायती आणि जिल्हापरिषदांच्याही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीतलं चित्र सर्व राजकीय पक्षांसाठी वेगळं असणार आहे. त्यातच शिवसेनेत पडलेल्या फुटीत मनसेला मोठं होण्याची संधी असल्याचे अनेक राजकीय जानकार बोलत आहे. दुसरीकडे मनसेही (MNS) आगामी निवडणुकींसाठी जोरदार कंबर कसली आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी तर दौऱ्यांचा सापाटा लावला आहे. विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अमित ठाकरे सध्या पोहोचत आहेत. यातच आता अमित ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या तारखा आणि टीझरही आला आहे. हा टीजर प्रत्येक मनसैनिकाला हुरूप भरवणारा आहे.
अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार
अमित ठाकरे कोकण पिंजून काढणार, टीझरही आला, शिवसेनेच्या भांडणाचा लाभ मनसेला होणार? pic.twitter.com/f3qZrz66hP
— Abhishek karande (@Abhishekkaran16) July 3, 2022
कसा असेल अमित ठाकरे यांचा कोकण दौरा?
- 5 जुलै ते 11 जुलै असा 7 दिवसांचा कोकण दौरा अमित ठाकरे करणार आहेत.
- या दौऱ्यात सिंधुदुर्गात दोन दिवस 5 आणि 6 जुलै रोजी असणार आहेत.
- तर रत्नागिरीत दोन दिवस 7 आणि 8 जुलैला असणार आहेत
- तसेच रायगडमध्ये तीन दिवस 9,10,11 जुलै असे एकूण 7 दिवस अमित ठाकरे तालुका तसंच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी तसंच मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्याशी संवाद साधणार आहेत.
मनसेच्या अधिकृत अकाऊंडवरूनही माहिती
तसेच या दौऱ्याची मनसेनेही अधिकृतपणे ट्विट करत महिती दिली आहे. यात दौऱ्याच्या सविस्तर तारखाही दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितसाहेब ठाकरे यांचे राज्यस्तरीय मनविसे पुनर्बांधणी ‘महासंपर्क’ अभियान लवकरच सुरू होत आहे. असे ट्विट मनसेकडून करण्यात आलंय.
मनसेचं ट्विट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितसाहेब ठाकरे यांचे राज्यस्तरीय मनविसे पुनर्बांधणी ‘महासंपर्क’ अभियान लवकरच सुरू होत आहे. pic.twitter.com/fpkxdf7FBZ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 2, 2022
शिवसेनेच्या भांडणाचा मनसेला फायदा होणार?
राज्यात सध्या शिवसेनेत पडलेली फूट ही काहीशी मनसेच्या पत्त्यावरही पडू शकते. या संघर्षाला वैतागलेले कार्यकर्ते हे आगाडी निवडणुकीत मनसेलाही मदत करण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. तसेच काही ठिकाणी मनसे आणि भाजपच्या युतीच्याही चर्चा आहेत. आता या सर्व शक्यता आणि चर्चा किती खऱ्या ठरतात हे तर निवडणुकीतील आकडेच सांगतील.