“बंद करा ती कॉलर ट्यून” ‘कोरोना’च्या ट्यूनने बाळा नांदगावकर वैतागले

| Updated on: Aug 21, 2020 | 8:34 AM

"जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे कॉलर ट्यून त्वरित बंद करावी" अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली.

बंद करा ती कॉलर ट्यून कोरोनाच्या ट्यूनने बाळा नांदगावकर वैतागले
Follow us on

मुंबई : ‘कोरोना’च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता त्रस्त झाले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी केली आहे. (MNS Leader Bala Nandgaonkar demands to stop Caller Tune on Corona Awareness)

“कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही” असे नांदगावकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

“जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी” अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

सुरुवातीला “आम्हाला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही” ही कॉलर ट्यून ऐकायला मिळत होती, तर आता “देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे, तरी आपण गरज नसताना घराबाहेर पडू नये” ही कॉलर ट्यून ऐकायला मिळते. काही सेकंद चालणारी ही ट्यून सातत्याने ऐकून त्रासल्याचे अनेक जन सांगतात.

हेही वाचा : पेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको, सिगरेट-तंबाखूवर ‘कोरोना सेस’ आकारा : बाळा नांदगावकर

याआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोना काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला होता.

“सर्वसामान्यात कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे, 3 महिने झाले तरी रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे हे मोदींनी सांगितल्याशिवाय कळणार नाही” असं प्रकाश आंबेडकर जून महिन्यात म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

आम्हाला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही, कॉलर ट्यूनवर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप

(MNS Leader Bala Nandgaonkar demands to stop Caller Tune on Corona Awareness)