बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना बाळा नांदगावकर गहिवरले, म्हणाले….

| Updated on: Jan 30, 2021 | 3:45 PM

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईतल्या कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. | MNS Leader Bala Nandgaonkar Visit Balasaheb Thackeray Statue

बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना बाळा नांदगावकर गहिवरले, म्हणाले....
Balasaheb Thackeray And Bala Nandgaonkar
Follow us on

मुंबई : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईतल्या कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. बाळसाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना नांदगावकर यांना चांगलंच गहिवरुन आलं होतं. (MNS Leader Bala Nandgaonkar greeted Balasaheb Thackeray)

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत्या कुलाब्यात त्यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरेही उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला बाळा नांदगावकर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं.

बाळा नांदगावकर आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ पोहोचले. त्यांच्या पुतळ्यावर गुलाबाच्या फुलांची उधळण करत बाळासाहेबांचा त्यांनी आशीर्वाद घेतला. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी मी मुंबईत नसल्याने पुतळ्याचं दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे मी आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे. बाळासाहेबांनी सगळ्या मराठी माणसाच्या मनात अग्नी पेटवला आहे. त्यामुळे मराठी माणूस, हिंदू आणि इतर भाषिक लोकांमध्ये देखील त्यांच्याविषयी प्रेम आहे. बाळासाहेबांना अभिवादन करुन खूप बरं वाटलं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

बाळासाहेब होते म्हणून आम्ही आहोत

बाळासाहेब म्हणजे आमच्यासाठी दैवतच, ते जरी प्रत्यक्षात आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणीची शिदोरी ही कायमच सोबत आहे. त्यांनी घडविलेला प्रत्येक कार्यकर्ता हा कायमच त्यांच्या ऋणात आहे आणि राहील, असं ते म्हणाले.

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र

नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नव्हते. त्यानंतर पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी दुसऱ्यांदा उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर आले.

(MNS Leader Bala Nandgaonkar greeted Balasaheb Thackeray)

हे ही वाचा

Balasaheb Thackeray : मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण