‘काही दिवसांत सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री दिसतील!’, मनसेच्या गजानन काळेंची खोचक टीका

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होऊ दे असं तुळजाभवानीकडे साकडं घातलं आहे. तर उद्धव ठाकरे हेच पुढील 25 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलंय. यावर मनसे नेते गजानन काळे यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय.

'काही दिवसांत सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री दिसतील!', मनसेच्या गजानन काळेंची खोचक टीका
गजानन काळे, संजय राऊत, सुप्रिया सुळेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 5:28 PM

मुंबई : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला जवळपास अडीच वर्षे झाली. भाजपकडून सरकार पडणार असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला. मात्र, अद्यापतरी महाविकास आघाडी सरकार कायम आहे आणि ते पुढील पाच वर्षे टिकेल, असा दावा महाविकास आघाडीचे नेते करतात. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वादविवाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होऊ दे असं तुळजाभवानीकडे साकडं घातलं आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच पुढील 25 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलंय. यावर मनसे नेते गजानन काळे यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय.

गजानन काळेंचा राऊतांवर निशाणा

‘विश्व प्रवक्ते संजय राऊत म्हणतात की पुढची 25 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. सुप्रिया सुळे म्हणतात, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, मी तुळजाभवानीला नवस फेडायला येईन. राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री नकोय हे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. पुढच्या काळात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीकडून संजय राऊत उपमुख्यमंत्री हे चित्र शिवसैनिकांनी पाहणं बाकी आहे. शिवसैनिकांनो काळजी घ्या, लाचार संजय राऊतांना आवरा’, अशा शब्दात गजानन काळे यांनी संजय राऊतांवर टीका केलीय.

शिवसेनेतील गजानन किर्तीकर, संजय जाधव, श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल उघड नाराजी बोलून दाखवत आहेत. तरीही विश्वप्रवक्ते संजय राऊतांना मनसेच्या कोंडीची काळजी आहे. शिवसेनेची कोंडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून होत आहे हे पाहवत नाही की काय? असा खोचक सवालही गजानन काळे यांनी विचारलाय.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रीपदासाठी नवस!

खासदार सुप्रिया सुळे या रविवारी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. माध्यमांशी संवाद साधताना ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार, असं साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? असं विचारलं असता, त्याबाबत मी सांगू शकत नाही. मी ज्योतिष नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबतही मी कधी विचार केला नाही. महाराष्ट्रातील लोकच हे सगळं ठरवतील मी कसं ठरवणार?’, असं सुप्रिया सुळे म्हणा्या होत्या.

राऊत म्हणतात, 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री

तर ‘उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री आहेत आणि हेच 25 वर्षे मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात’, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी सुळेंना दिलं आहे. ‘सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, सुप्रिया सुळे असे सर्व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्यामुळे कुणी असा प्रश्न निर्माण करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा’, असंही राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.