मुंबईः पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल या धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेविरोधात नेहमीच आक्रमक टीका करणारे मनसे नेते गजानन काळेंनीही (Gajanan Kale) हाच धागा पकडत शिवसेनेवर (Shiv Sena) तुफ्फान टोलेबाजी केली. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार म्हटल्यावर संजय राऊत आणि सेनेनं काय तुमची धुणी भांडी करायची का? असा खोचक सवाल गजानन काळेंनी केलाय. साताऱ्यामध्ये धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं तर मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटरद्वारे यावर प्रतिक्रिया दिली. इकडे संजय राऊतांना याविषयी प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी याविषयी बोलणंच सपशेल टाळलं. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा आणि प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा हक्क आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
सातारा येथील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच वर्ष माझ्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली होती. ती मी उत्तम रितीने निभावली. सत्ताधारी पक्ष कितीही मजबूत असला तरी त्याला गदागदा हलवू शकतो. मी ज्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात काम करतो, तिथं मन लावून काम करेन. त्यामुळे आगामी जे कुणी मुख्यमंत्री असतील, ते आपलेच असतील.. ते म्हणतील हा विभाग आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाला नको… वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल-धनंजय मुंडे
संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय धूनी भांडी करायची का मग तुमची ?
हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे.आणि तो सहन केला जाणार नाही.
खंजीर,कोथळा,वाघनखे,मर्द,मावळा सह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा.
अर्थात दै.सामना नव्हे टोमणा.— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 4, 2022
धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याचा धागा पकडत मनसे नेते गजानन काळेंनी शिवसेनेवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर संजय राऊत आणि सेनेनं काय तुमची धुणीभांडी करायची का, असा सवाल त्यांनी केलाय. हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे आणि तो सहन केला जाणार नाही.
खंजीर, कोथळा, वाघनखे, मर्द, मावळासह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा. अर्थात दै. सामना नव्हे टोमणा..
या शब्दात गजानन काळे यांनी संजय राऊतांवर तुफान टोलेबाजी केली.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणंच टाळली. कुणी काहीही बोलतं, त्यावर मी बोलणार नाही, अशा शब्दात राऊतांनी पत्रकारांना बोलण्यास नकार दिला.