मातोश्री-2 कशी उभारली? नेत्याच्या प्रश्नाने पुन्हा खळबळ
मातोश्री 2 कशावर झालंय. 126 कोटी बापाचे आणि 11 कोटी मुलाचे कुठून आले? असे सवाल या नेत्याने उपस्थित केले आहेत.
पुणेः सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कृष्णकुंज अपार्टमेंटवरून कालच्या सभेत प्रश्नचिन्ह उभे केले. यावरून मनसे नेत्याने जहरी टीका केली आहे. सुषमा अंधारेंनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, मातोश्री 2 (Matoshree 2) कशी उभी राहिली, हे स्पष्ट करावं… माझे नेते (राज ठाकरे) हे शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. त्यामुळे त्यात काहीही चुकीचं नाही, असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं आहे.
सुषमा अंधारे आणि त्यांच्या भाषणांवर प्रकाश महाजन यांनी सडकून टीका केली. मातोश्री 2 वरूनही त्यांनी प्रश्न चिन्ह उभं केलं. ते म्हणाले, सुषमा अंधारे यांनी विचार करून बोलावं. त्यांच्या मालकाला विचारून बोलावं. माझे नेते शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. सगळे कर भरतात. टोपल्याखाली झाकून काही करत नाहीत.
काय आहे मातोश्री 2?
शिवसेना प्रमुखांचे मुख्य निवासस्थान मुंबईत वांद्रे येथील कलानगर येथे मातोश्री बंगल्यात आहे. याच मातोश्रीवरून शिवसेना पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. 2019 मध्ये या इमारतीशेजारीच आठ मजली मातोश्री 2 ही इमारत बांधण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्याच वर्षी ही इमारत उभी राहिली.
मला एका प्रश्नाचं तिनं उत्तर द्यावं, मातोश्री 2 कशावर झालंय. 126 कोटी बापाचे आणि 11 कोटी मुलाचे कुठून आले? हे काय धंदा करत होते? काय करत होते? कशाला बोलताय? असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला.
सुषमा अंधारेंवर टीका करताना प्रकाश महाजन म्हणाले, नव्याने मुसलमान झाल्याने दिसेल त्याला ती बाई आदाब आदाब करीत सुटली.
स्त्री म्हणून मी गप्प आहे. इथून पुढे राज ठाकरेंवर टीका करताल तर आम्हाला तुझं सगळंच माहिती आहे, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला आहे.