मोठी बातमी | संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे हेच ते? CCTV फुटेजवरून पोलिसांनी 2 चेहरे हेरले!

दोन सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांनी जारी केले आहेत. तर दोन चेहरे या घटनेतील आरोपी असल्याचं सांगण्यात येतय.

मोठी बातमी | संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे हेच ते? CCTV फुटेजवरून पोलिसांनी 2 चेहरे हेरले!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 10:10 AM

मुंबई : खळबमहाराष्ट्रात ळ उडवून देणाऱ्या घटनेनं शुक्रवारचा दिवस गाजला. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep deshpande) यांच्यावर भर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला नेमका कुणी केला आणि त्यामागील हेतू काय आहे, हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. पोलिसांनी या दिशेने वेगाने तपास सुरु केला आहे. नुकतीच मुंबई पोलिसांच्या वतीने संशयित आरोपींची दोन छायाचित्र सादर करण्यात आली आहे. काल दिवसभर दादर, शिवाजी पार्क परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी खंगाळून काढली. यापैकी दोन सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांनी जारी केले आहेत. तर दोन चेहरे या घटनेतील आरोपी असल्याचं सांगण्यात येतय. या प्रकरणी काल 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

भांडूपमधून दोघे ताब्यात

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला नेमका कुणी केला, या तपासासाठी पोलिसांनी आठ तपास पथकं नेमली आहेत. पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. भांडूप परिसरातून या दोघांना पोलिसांनी पकडल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय वादातून हल्ला झाल्याचं आरोपींच्या चौकशींतून पुढे आलं आहे. यापैकी एका आरोपीचं नावही कळलंय, मात्र तो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

स्टंप आणि रॉडने हल्ला

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल म्हणजेच ३ मार्च रोजी शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हल्ला झाला. संदीप देशपांडे हे नेमहीप्रमाणे दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. नेहमी त्यांच्यासोबत काही मित्र असतात. मात्र काल ते एकटेच होते. हीच संधी हेरून हल्लेखोरांनी मागून येऊन त्यांच्यावर वार केले. हल्लेखोरांच्या हातात स्टंप आणि रॉड होते. संदीप देशपांडे यांनीही तत्काळ प्रतिकार केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यामुळे हल्लेखोर पळून गेले. मात्र या झटापटीत संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर तत्काळ हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.