14 कोटींपैकी 18 हजार लोकांना शिवथाळी, इतरांनी जेवायला ‘मातोश्री’वर जायचं की ‘वर्षा’वर : संदीप देशपांडे
मनसेच्या दिशा येणाऱ्या अधिवेशनात ठरवू. एक नवी दिशा देण्याचे काम करु," असेही संदीप देशपांडे (mns sandeep deshpande on shivthali) म्हणाले.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात अणली असून त्याबाबत शासन निर्णयही काढण्यात (mns sandeep deshpande on shivthali) आला. “राज्यात अनेक ठिकाणी शिवथाळी सुरु करण्यात आली आहे. मात्र ही शिवथाळी नक्की कोणासाठी? 14 कोटींपैकी 18 हजार लोकांना शिवथाळी मिळणार आहे. मग बाकीच्यांनी काय मातोश्रीवर जाऊन जेवायचं की वर्षावर जाऊन?” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला (mns sandeep deshpande on shivthali) आहे.
महाविकासआघाडीच्या खातेवाटपावरही संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. “एवढं गोंधळलेले सरकार मी आजपर्यंत बघितलेले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन होणार की नाही यावर तीन पक्षांचा गोंधळ होता. आपण एकत्र यायचा की नाही. तो गोंधळ संपून मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा गोंधळ सुरु झाला.”
“कोण शपथ घेणार कोण शपथ घेणार असे करत करत शिवाजी पार्कवर 6 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्या 6 मंत्र्यांना जे खातेवाटप करण्यात आलं तेही तात्पुरतं असल्याचे सांगण्यात आलं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल यावर 15 ते 20 दिवस खलबतं झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला,” असेही संदीप देशपांडे यावेळी (mns sandeep deshpande on shivthali) म्हणाले.
“यानंतर आता खातेवाटपासाठी चार दिवस जातात. तरी अजून खातेवाटप होत नाही. सरकार स्थापन होण्यापूर्वी 20 दिवस बैठका केल्या. मग त्या बैठकीत काय सुरु होतं. त्यात काय खेळ खेळत होते का?,” अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली.
“जवळपास 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि सरकार खातेवाटपात मश्गुल आहे. हे पहिलं सरकार असेल ज्याने खातेवाटपाआधी बंगले वाटप केलं. म्हणजेच मंत्र्यांना खात्यापेक्षा बंगल्यातच जास्त इंटरेस्ट आहे. यावरुन हे सरकार किती गंभीर आहे.” असेही संदीप देशपांडे (mns sandeep deshpande on shivthali) म्हणाले.
“मंत्र्यांना खाती खाण्यासाठी हवीत की लोकांची सेवा करण्यासाठी असेही संदीप देशपांडे म्हणाले. मुख्यमंत्री पूर्ण दिवस सलमान खानला भेटण्यासाठी महापौर बंगल्यात बसले होते. हे त्यांचे काम आहे का?” असेही ते म्हणाले.
“मंत्री कुठली कामं करतात. झोपा काढतात. बिनखात्याचे मंत्री आहे. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. असेही देशपांडे म्हणाले. “ऐतिहासिक आघाडी आहे का असा प्रश्न संदीप देशपांडे यांना विचारला असता, ते म्हणाले, इतिहास ठरवेल की ही सर्वात मोठी घोडचूक आहे. ज्या पद्धतीने तीन जण एकत्र आले आहेत. कोणतेही उद्दिष्ट नाही. आपल्या स्वत:चे भलं कस होईल यामुळे हे सर्व एकत्र आले आहेत.
“मनसेच्या दिशा येणाऱ्या अधिवेशनात ठरवू. एक नवी दिशा देण्याचे काम करु,” असेही संदीप देशपांडे यावेळी (mns sandeep deshpande on shivthali) म्हणाले.