मनसेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक न लढण्याचा सूर

पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray meeting) सुरात सूर मिसळला. विशेष म्हणजे स्वतःकडचे पैसे जपून वापरा. देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल, असा सल्लाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.

मनसेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक न लढण्याचा सूर
Follow us
| Updated on: Sep 13, 2019 | 5:11 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढता राज्यभरात भाजपच्या विरोधात प्रचार केला. यावेळी मनसेचा विधानसभा निवडणूकही न लढण्याचा सूर (Raj Thackeray meeting) पाहायला मिळतोय. कारण, मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी निवडणूक न लढण्याबाबत सूर व्यक्त केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray meeting) सुरात सूर मिसळला. विशेष म्हणजे स्वतःकडचे पैसे जपून वापरा. देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल, असा सल्लाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरु केलं होतं. यासाठी त्यांनी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची भेटही घेतली. मतपत्रिकांवर निवडणूक न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. यानंतर मनसे आता स्वतःच निवडणूक न लढण्याच्या पावित्र्यात असल्याचं दिसत आहे.

या कठीण आर्थिक परिस्थितीत निवडणूक लढवणेही कठीण असल्याचं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी बैठकीत केल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणूक लढायची झाल्यास उमेदवाराला पक्षाकडून आर्थिक पाठबळ मिळणं कठीण असल्याचं यातून स्पष्ट झाल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, राज ठाकरे यांचा निवडणूक न लढण्याचा सूर पाहाता बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही सूर मिसळला. पण काही पदाधिकाऱ्यांची आजही निवडणूक लढण्याची भावना आहे. काही जागा लढवाव्यात अशी काही पदाधिकऱ्यांची भावना असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पराभव झाल्यास नाचक्कीची भीती

काही जागा लढून त्या सर्व जागांवर पराभव झाल्यास पक्षाची नाचक्की होण्याची भीती बैठकीत व्यक्त झाली. सध्या आपला देश रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि अरब राष्ट्र चालवत आहेत, असं मत राज ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केलं. संघालाही देशात सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज येत नाही. आर्थिक संकटामुळे देशातील उद्योगपतीही भीतीखाली आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी काही उद्योगपतींची नावंही घेतली.

दरम्यान, बैठकीत निवडणूक लढण्याबाबत राज ठाकरेंनी अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यांनी केवळ पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. मनसे लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची अपेक्षा आहे.

लोकसभेची एकही जागा लढली नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा 2019 च्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नव्हता. राज ठाकरे यांनी एकप्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह या दोघांना थेट विरोध करत, राज ठाकरेंनी प्रचाराचा धुरळा उडवला होता.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.