मुंबई : कल्याण डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ‘कृष्णकुंज’वर खलबतं सुरु झाली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी मनसेने तयार केली आहे. (MNS Meeting Krishnakunja plans Raj Thackeray Amit Thackeray Sandeep Deshpande)
मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस संजय नाईक, राजा चौगुले या बैठकीला उपस्थित होते.
लोकसभानिहाय नेता -सरचिटणीस यांची कमिटी
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह विविध मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी बैठकीनंतर दिली. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली आहे. ही कमिटी त्या लोकसभेत जाऊन आढावा घेणार आहे. त्याचा अहवाल 25 फेब्रुवारीपर्यंत राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे, असंही सरदेसाईंनी सांगितलं.
मुंबईप्रमाणे मुंबईबाहेर ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण डोंबिवली यासाठी एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली जाणार आहे.
लोकसभा मतदारसंघनिहाय मनसेची समिती
1) उत्तर मुंबई
बाळा नांदगावकर – नेते, मनसे
संजय नाईक – सरचिटणीस, मनसे
2) उत्तर मध्य
संजय चित्रे – नेते, मनसे
राजा चौगुले – सरचिटणीस, मनसे
3) उत्तर पश्चिम
शिरीष सावंत – नेते, मनसे
आदित्य शिरोडकर – सरचिटणीस, मनसे
4) दक्षिण मध्य
अविनाश अभ्यंकर – नेते, मनसे
नयन कदम – सरचिटणीस, मनसे
(MNS Meeting Krishnakunja plans Raj Thackeray Amit Thackeray Sandeep Deshpande)
5) दक्षिण मुंबई
नितीन सरदेसाई – नेते, मनसे
मनोज चव्हाण – सरचिटणीस, मनसे
6) उत्तर पूर्व
अमित ठाकरे – नेते, मनसे
संदीप देशपांडे – सरचिटणीस, मनसे
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे संस्थापक सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्ष, डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राजेश कदम यांच्यासोबत दीपक भोसले, सागर जेढे, कल्याण ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी शिवबंधन बांधल्याने, मनसेला खिंडार पडलं.
राजेश कदम यांच्या प्रवोशामागे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी आहे. त्यांनी विरोधी पक्षातील बडा नेता फोडून, मनसेची हवाच गुल केल्याची चर्चा कल्याण डोंबिवलीत आहे. जितके कार्यकर्ते शिवसेनेत गेले आहे ते मनसेचे कट्टर कार्यकर्ते होते, स्थापनेपासून ते मनसेत होते. मात्र आता हेच कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने, मनसेला मोठा धक्का आहे.
VIDEO :
संबंधित बातम्या:
शिवसेना-भाजपचा मनसेला ‘दे धक्का’; राज ठाकरेंसाठी ‘हा’ मराठी अभिनेता पुढे सरसावला
मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये
(MNS Meeting Krishnakunja plans Raj Thackeray Amit Thackeray Sandeep Deshpande)