ठाणे : “अखेर पत्रीपुलाचे गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण झाले. खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांचं अभिनंदन. असंच काम करा, ज्यामुळे आम्हाला बोलावं लागणार नाही”, असा टोला मनसे आमदार राजू पाटील (MNS Raju Patil) यांनी लगावला. दरम्यान, पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम सोमवारी (23 नोव्हेंबर) सकाळी पूर्ण झाल्यानंतर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावर राजू पाटील यांनी टीका केली. “इव्हेंटची सांगता फटाके फोडून झाली”, असा चिमटा राजू पाटील यांनी काढला (MNS MLA Raju Patil congratulate MP Shrikant Shinde).
कल्याण पत्रीपुलाला जोडणारा एक 90 फूटी रस्ता अर्धवट आहे. महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपूर्वी या रस्त्याच्या विकासाला बाधित ठरणाऱ्या काही नागरीकांची घरे तातडीने तोडली गेली. त्यांना बेघर करण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. दुसरीकडे या 90 फूटी रस्त्यांचं बाधकाम शिवसेनेच्या एका माजी महापौरांनी अडवून ठेवलं आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील (MNS Raju Patil) यांनी रस्ता बाधितांसह महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांची भेट घेतली.
बांधितांना लवकरात लवकर मोबदला दिला जाईल, असं आश्वासन विजय सुर्यवंशी यांनी आमदारांना दिलं. बाधित कुटुंबियांची मोबदला मिळेल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र आमदार पाटील यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांना मोबदला मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्यात आहेत. यावेळी राजू पाटील यांना गर्डर लाँचिंग विषयी बोलताना सर्वांचे अभिनंदन केले आहे (MNS MLA Raju Patil congratulate MP Shrikant Shinde).
पत्रीपुलाचा गर्डर बसविण्याचं काम पूर्ण
पत्रीपुलाच्या सर्वात मोठ्या अशा 76 मीटर गर्डर लाँचिंगसाठी 21 आणि 22 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला. यातील पहिल्या दिवशी 21 नोव्हेंबरला या गर्डरचे नियोजित 40 मीटर ढकलण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. तर 22 तारखेला मेगाब्लॉक सुरू होण्यास झालेल्या विलंबामुळे 90 टक्केच काम होऊ पूर्ण शकले. उर्वरित 10 टक्के कामासाठी पुन्हा रेल्वेच्या विशेष ब्लॉकची आवश्यकता होती. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत लवकरात लवकर ब्लॉक मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रेल्वे प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रात्री 1.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास विशेष ब्लॉक मंजूर केला.
मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास सुरु झालेले गर्डर लाँचिंगचे काम पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्ण झाले. श्रीकांत शिंदे हे सकाळप्रमाणेच मध्यरात्रीही काम पूर्ण होईपर्यंत याठिकाणी हजर होते. खासदारांनी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पत्री पुलाचा गर्डर तयार करायला ग्लोबल स्टील या कंपनी प्रबंधनाला भरपूर मेहनत घ्यावी लागली. 700 मेट्रिक टनच्या या कार्डर मध्ये 25 किमी वेल्डिंग, 30 हजार बोल्टचा वापर करण्यात आला आहे.
100 वर्षाहून अधिक हा पूल टिकू शकेल असा दावा ग्लोबल कंपनीचे प्रमुख ऋषी अग्रवाल यांनी केला आहे. कोरोनाकाळात सर्व काही बंद असताना हा गर्डर 45 दिवसात तयार करण्यात आला. या गर्डरच्या कामासाठी 200 कर्मचारी दिवस रात्र काम करत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने या पुलाच्या आराखड्याचे काम पूर्ण होत आहे. सतत मीडियावर येणाऱ्या बातम्या पाहून वेळात पूल तयार करण्याचा मानस असल्याचे ग्लोबल स्टील कंपनीचे संचालक ऋशी अग्रवाल यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डरचे 10 % काम अपूर्ण; काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक मेगाब्लॉक होणार?
कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डरचे काम सुरु, आदित्य ठाकरेंची उपस्थिती