जावई बापू डोंबिवलीकडे लक्ष द्या, मनसेच्या एकमेव आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला
मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यात लक्ष द्यावे," अशी मागणी पत्राद्वारे केली (MNS raju patil criticizes cm uddhav thackeray) आहे.
ठाणे : “डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहरांच्या दुरावस्थेला जबाबदार एमआयडीसी या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा,” अशी मागणी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे यांच्याकडे केली (MNS raju patil criticizes cm uddhav thackeray) आहे. “मुख्यमंत्री हे डोंबिवलीचे जावई आहेत. त्यांनी या शहरावर लक्ष द्यावे,” असा टोलाही राजू पाटील यांनी लगावला आहे.
गेल्या 25 वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली शहरात वाढते प्रदूषण, अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, नाले तुंबणे यासाठी हेच अधिकारी जबाबदार आहेत. असा आरोपही राजू पाटील यांनी केला आहे.
“याबाबत आम्ही सतत आंदोलन करत असतो. एमआयडीसीतील प्रदूषण, कधी हिरवा पाऊस पडतो. कधी गॅस लीक होतो. या सर्व गोष्टींचा हिवाळ्यात याचा फार त्रास होतो. याबाबत आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. पण मध्यतंरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही अधिकारी आले होते. त्यांनी याबाबतचा आढावा घेतल्यानंत या ठिकाणी स्वच्छता नाही असे समजले. तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना अक्षरश: झापलं. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यात लक्ष द्यावे,” अशी मागणी पत्राद्वारे केली (MNS raju patil criticizes cm uddhav thackeray) आहे.
“डोंबिवली शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे. या ठिकाणी प्रचंड प्रदूषण आहे. त्यावर तुम्ही तरी लक्ष द्या. या अधिकाऱ्यांवर लक्ष द्या. जर आम्ही गेलो, तर आमच्यावर कलम 353 अंतर्गत तक्रारी होतात. याबाबत आंदोलन किती वेळा करणार त्यालाही मर्यादा असते,” असेही राजू पाटील यावेळी म्हणाले.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे. ते डोबिंवलीचे जावई आहेत. हे मी कोणत्याही टीका करण्याच्या हिशोबाने बोलत नाही. त्यांनी शहरावर लक्ष द्यावे आणि डोंबिवली शहर सुधारावे, असेही राजू पाटील यांनी स्पष्ट (MNS raju patil criticizes cm uddhav thackeray) केले.