डोंबिवलीत भोपाळ होण्याची वाट पाहताय का? मनसे आमदाराचा ठाकरे सरकारला सवाल
डोबिंवलीत लागलेल्या या आगीवरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं (MNS raju patil crtizies government) आहे.
डोंबिवली : डोंबिवलीतील एमआयडीसी फेस 2 मधील मेट्रो पोलिटीन (Dombivali Fire) या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. गेल्या 5 तासांपासून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे. डोबिंवलीत लागलेल्या या आगीवरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं (MNS raju patil crtizies government) आहे. सरकार डोंबिवलीत एखादं भोपाळ होण्याची वाट पाहतायं का? असा प्रश्नही राजू पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
“काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डोंबिवली दौऱ्यासाठी आले होते. काही नागरिकांनी समस्या सांगितली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. काही वर्षांपूर्वी हायकोर्टाने ज्या 5 कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी ही एक कंपनी आहे. तीही बंद करण्यात आली नाही. सरकार डोंबिवलीत एखादं भोपाळ होण्याची वाट पाहतायं का?” असा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला.
“काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. त्यावेळी तत्कालीन पर्यावरण मंत्री या ठिकाणी आले होते. तेव्हा त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र लोकांमध्ये चर्चा होती की त्यांना पॉकिट पोहचले. त्यामुळे कारवाई झाली नाही,” असेही राजू पाटील (MNS raju patil crtizies government) म्हणाले
“मी मुख्यमंत्र्यांवर असा काही आरोप करत नाही. मात्र ते संशयाच्या भोवऱ्यात सापडण्यापूर्वी त्यांनी लवकरात लवकर कारवाई करा, अशी मी नागरिकांतर्फे विनंती करतो, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होईल,” असा टोलाही राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
गेल्या पाच तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा सध्या तपास सुरु आहे. ही आग पसरत असल्याने सुरक्षेच्या कारणात्सव आजूबाजूचा परिसर रिकामी करण्यात आला आहे. या आगीनंतर या कंपनीतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण 5 तासांपासून आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशमन दलाला अद्याप यश आलेलं (MNS raju patil crtizies government) नाही.