विचार महाराष्ट्र धर्माचा, भगव्या रंगात मनसेच्या महाअधिवेशनाचं नवं पोस्टर लाँच
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशानाचे अधिकृत पोस्टर लाँच करण्यात आले (MNS Maha Adhiveshan new poster) आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशानाचे अधिकृत पोस्टर लाँच करण्यात आले (MNS Maha Adhiveshan new poster) आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त 23 जानेवारीला मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनापूर्वी मनसेचे नवं पोस्टर समोर आलं आहे. यावर भगव्या रंगाचा महाराष्ट्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनसे येत्या अधिवेशनात नेमकं काय घोषणा करणार याची उत्सुकता अनेकांमध्ये पाहायला मिळत (MNS Maha Adhiveshan new poster) आहे.
अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या पहिल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून महाअधिवेशनाचे पोस्टर टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत. यात चॉकलेटी रंगाच्या पृष्ठभागावर भगव्या रंगाचे महाराष्ट्र दिसतं आहे. यावर “विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा” असे लिहिले आहे.
विशेष म्हणजे या पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. मात्र यावर मनसेच्या अधिकृत झेंडा दिसत नाही. यावरुन मनसेची राजकीय वाटचाल मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यांची सांगड अशी असेल का? असे तर्क वितर्क लढवले जात आहे. त्यामुळे मनसेच्या महाअधिवेशनाची उत्सुकता शिगेला पोहोचली (MNS Maha Adhiveshan new poster) आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवन परिसरात भव्य पोस्टर लावण्यात आलं होतं. ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं या पोस्टरवर लिहिलं आहे.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं अधिवेशनात अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मनसेने 23 जानेवारी ही तारीख निवडली आहे. त्यासोबतच पक्षाच्या झेंड्यातही बदल करत मनसे हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरु आहे.