राज ठाकरे विधानसभेचं रणशिंग फुंकणार?, रडारवर कोण? कुणावर बरसणार? मेळाव्याकडे लक्ष

यापूर्वी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे स्वबळाचा नारा देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे विधानसभेचं रणशिंग फुंकणार?, रडारवर कोण? कुणावर बरसणार? मेळाव्याकडे लक्ष
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 10:50 AM

MNS Raj Thackeray Assembly election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या सर्वच पक्षांकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं होतं. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोरदार कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात एक मेळावा आयोजित केला आहे. गुरुवारी २५ जुलै सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील मनसे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी पक्षातील नेते, पदाधिकारी यांची नियुक्ती केली होती. या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना त्या जिल्ह्यातील अहवाल सादर केला आहे. या निरीक्षक अहवालाबद्दलची माहिती घेतल्यानंतर आज राज ठाकरेंनी पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

राज ठाकरे काय बोलणार?

त्यामुळे आजच्या होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाऱ्यांना काय सूचना देणार, त्यांना काय मार्गदर्शन करणार याचीही उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान यापूर्वी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे स्वबळाचा नारा देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.