नोटेवर बापूंच्या जागी इतर नेत्यांचे फोटो लावण्यावरून चढाओढ, मनसेची भूमिका काय?

नोटेवर बापू्च्या जागी इतर नेत्यांचे फोटो लावण्यावरून चढाओढ सुरु आहे. त्यावर आता मनसेची प्रतिक्रिया आली आहे...

नोटेवर बापूंच्या जागी इतर नेत्यांचे फोटो लावण्यावरून चढाओढ, मनसेची भूमिका काय?
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 5:01 PM

मुंबई : भारतीय चलनातील नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटो ऐवजी इतर नेत्यांचे फोटो लावण्याची मागणी जोर धरत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चलनातील नोटेवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावण्याचं विधान केलं आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. विविध राजकीय पक्ष आणि नेते विविध मागण्या करत आहेत. यावर मनसेची भूमिका काय आहे याबाबत प्रश्न विचारले जात होते. त्यावर मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मनसेची भूमिका मांडली आहे.

आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. पायाभूत सुविधांवर भर देण्याची विनंती राजू पाटील यांनी केली आहे.

राजू पाटील यांचं ट्विट

सध्याचं राजकारण पाहून जनता NOTA वापरायच्या मुडमध्ये आहे.त्यामुळे महागाई कमी करा. शेतकरी बांधवांना दिलासा द्या. रस्ते चांगले करा. चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा. रूपया मजबूत करा. उगीचच कशाला त्या नोटा आणि फोटोंच्या मागे लागलाय? सामान्यांना याचा काय फायदा? फालतू राजकारण’ असं राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

ठाकरेगटाची भूमिका काय?

सगळेच नेते आपआपल्या पक्षाच्या नेत्यांच्या फोटोची मागणी करायला लागले तर बाळासाहेब ठाकरे ही आमची अस्मिता आहे. त्यामुळे भारतीय चलनातील नोटेवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात यावा, असं ठाकरेगटाचे नेते अनिल परब यांनी उपरोधाने म्हटलं आहे.

रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी गौतम बुद्ध यांचा फोटो नोटेवर लावण्याची मागणी केली आहे. बुद्ध ही भारताची ओळख आहे. त्यामुळे भारतीय चलनावर बुद्धांचा फोटो असावा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी चलनातील नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असावा, अशी मागणी केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.