अंधेरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट, राज ठाकरे यांचं फडणवीस यांना पत्रं; काय आहे आवाहन?

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट, राज ठाकरे यांचं फडणवीस यांना पत्रं; काय आहे आवाहन?
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 2:20 PM

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ही पहिली निवडणूक होतेय. ठाकरे आणि शिंदेगटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राज ठाकरेंच्या आवाहनाला फडणवीस प्रतिसाद देणार का?  भाजप उद्या मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का? हे पाहावं लागेल.

एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्याच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होते. हा इतिहास आहे. राज ठाकरेंच्या पत्राला फडणवीसांनी प्रतिसाद दिला तर तोच इतिहास कायम राहू शकतो.

आज सकाळीच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळातच राज ठाकरे यांनी फडणवीसांना हे पत्र लिहिलंय.

राज ठाकरे यांचं फडणवीसांना पत्र

श्री. देवेंद्र फडणवीस

उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!

एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणास लिहितो आहे.

आमदार के. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्यानं के. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.

माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे..

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझे मन सांगत.

अस करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.

आपला मित्र,

राज ठाकरे

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.