Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : बंड झाले आता थंड तरीही राज्याला अवकळाच, मनसेच्या राजू पाटलांनी मांडली राज्याची स्थिती

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. असे असतानाही आ. राजू पाटील यांनी आज सरकारच्या कामकाजाबाबत आणि रखडलेल्या मंत्रिमंडळाबाबत ट्विटच्या माध्यमातून खडे बोल सुनावले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला असला तरी सर्वकाही खपवूनच घेतले जाणार नाही. विकास कामे होत नसतील मनसे आवाज उठवणारच हाच इशारा राजू पाटलांनी आपल्या ट्विट मधून दिला आहे.

MNS : बंड झाले आता थंड तरीही राज्याला अवकळाच, मनसेच्या राजू पाटलांनी मांडली राज्याची स्थिती
मनसेचे आमदार राजू पाटीलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 8:34 PM

ठाणे : राज्यात रखडलेला (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यामुळे निर्माण झालेली स्थिती यामध्ये आता (MNS Party) मनसेनेही उडी घेतली आहे. भलेही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेने सरकारला पाठींबा दर्शवला असला तरी राज्यात जे काही चाललंय ते खपवूनच घेणार असा त्याचा अर्थ नसल्याचे (MLA Raju Patil) आ. राजू पाटील यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे. बंड हे आता थंड झाले असले तरी राज्याला आलेली अवकळा संपलेली नाही. तर पालिकेत नगरसेवक नाहीत , जिल्हाला पालकमंत्री नाही , राज्याला मंत्री नाहीत , मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय , सर्वकाही ठप्प आहे. यामध्ये तुमचे सर्वकाही ओक्के असली जनता मात्र त्रस्त असल्याचे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे. शिवाय ठाणेचे मुख्यमंत्री असताना शहराच्या झालेल्या दुरावस्थेचे दर्शनही त्यांनी घडवून दिले आहे.

पाठिंबा असूनही परखड मत

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. असे असतानाही आ. राजू पाटील यांनी आज सरकारच्या कामकाजाबाबत आणि रखडलेल्या मंत्रिमंडळाबाबत ट्विटच्या माध्यमातून खडे बोल सुनावले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला असला तरी सर्वकाही खपवूनच घेतले जाणार नाही. विकास कामे होत नसतील मनसे आवाज उठवणारच हाच इशारा राजू पाटलांनी आपल्या ट्विट मधून दिला आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो , पण लोकांचे सण आलेत . रस्त्यांवरचे खड्डे , वाहतूक कोंडी , रोगराई वाढत आहे . याकडे कोण बघेल ? असा सवाल ही ट्विटरवर ट्विट करून केल्याने सरकारच्या बाजूने मतदान करणारे मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेले ट्विट मुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या उंचावल्या होत्या.

मुलभूत सुविधाही नाहीत

सरकारला पाठिंबा याचा अर्थ चुकीच्या गोष्टींवरही पडदा असा होत नाही. केवळ घोषणाबाजी करुन उपयोग नाहीतर प्रत्यक्षात कामे होणेही तेवढेच महत्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये डोंबवली आणि कल्याणमधील रस्ता दुरुस्तीचे काम होणे शक्य नव्हते पण मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बनवण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात टास्क फोर्सही झाले नाही आणि नागरिकांच्या समस्याही मिटलेल्या नाहीत. त्यामुळे जिथे कामे झाली नाहीत तिथे आम्ही बोलणारच असा पवित्रा मनसेने घेतलेला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा म्हणजे सर्वकाही ग्राह्यच धरु नये असेही राजू पाटील यांनी सांगितले आहे.

ठाण्यामध्येही खड्डेच-खड्डे

मुख्यमंत्री ठाण्याचे असूनही येथील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या स्वरुपाची कामे केली जात आहेत. विकासाचे कुणाला काही राहिलेले नाही. शिवाय ही कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक असलेल्या मंत्रिमंडळाची निवड केली जात नाही. सर्वकाही ठप्प झाले आहे. यामध्ये त्यांचे ओक्के असली तरी जनता मात्र त्रस्त असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.