Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ मनसेचा मुंबईच्या महापौरांवर निशाणा

कोव्हिड सेंटर्सच्या नावाखाली शेकडो कोटींचे घोटाळे झाले. किश कंपनी नेमकी कोणाची आहे?" असा सवाल मनसेने उपस्थित केला.

'पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?' मनसेचा मुंबईच्या महापौरांवर निशाणा
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 3:39 PM

मुंबई : “आपल्याच मुलाला कोव्हिड सेंटर्सचे काम देत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी सगळ्यात आधी राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. ‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ असा सवाल देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला. मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि संतोष धुरी यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आरोप केले. महापौरांनी मात्र मनसेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (MNS Sandeep Deshpande alleges Mumbai Mayor Kishori Pednekar gave COVID Center contract to Son Saiprasad Pednekar)

“कोव्हिडच्या काळात महापालिकेत मोठे घोटाळे झाले. घोटाळे करण्यात शिवसेना सगळ्यात पुढे आहे. कोव्हिड सेंटर्सच्या नावाखाली शेकडो कोटींचे घोटाळे झाले. किश कंपनी नेमकी कोणाची आहे?” असा सवाल मनसेने उपस्थित केला.

“कोव्हिड सेंटर्स उभारली गेली, ती ई-कोटेशनच्या मार्गाने सुरु करण्यात आली. कोणतीही पडताळणी झाली नाही आणि कामं देण्यात आली. या सेंटर्समधून अनेक तक्रारी आल्या, की सुविधा नीट मिळत नाहीत. साडेबारा आणि साडेतीन लाखांच्या दोन परचेस ऑर्डर्स आमच्या हाती लागल्या आहेत. ‘किश कॉर्पोरेट सर्व्हीसेस इंडिया’ ही कंपनी आहे. तिला जंबो सेंटर्सचं काम मिळालं आहे. लोअर परळची ही कंपनी आहे. तिचे संचालक आहेत शैला गवस, गिरीश रेवणेकर आणि साईप्रसाद किशोर पेडणेकर. महापौरांनी स्वत:च्या कामाचा दुरुपयोग करुन ही कामं स्वत:च्या मुलाला दिलेली आहेत” असा आरोप मनसेने केला.

“राजकारण करु नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. म्हणजे भ्रष्टाचार करायला मोकळं सोडा का? आमच्यापुढे येऊ नका, असा का? मुंबईतले कोव्हिड सेंटर नेमके कोणाकोणाला दिले, याचा शोध आम्ही घेणार. ही सुरुवात आहे. यात सगळ्यांनी लक्ष द्यावं” असे आवाहनही मनसेने केले.

“मी खोटं बोलत असेन, पण ही कागदपत्र खोटं बोलत नाहीत. आपल्याच नातेवाईकांना काम देत महापौरांनी पदाचा गैरवापर केला, हे सिद्ध होत आहे. सगळ्यात आधी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. थेट भ्रष्टाचार झाला असेल, तर कारवाई झाली पाहिजे. नाही झाली, तर पुढे काय करायचं ते बघूच” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

“आमदार राजू पाटील विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. विरोधी पक्षाने यात लक्ष घालावं, अधिवेशनात जाब विचारावा, जनतेतून जरी ते निवडून आले नसले, तरी आता ते मुख्यमंत्री आहेत. या पदासाठी कितपत योग्य ते उतरतात हे आता कळेल” असे म्हणत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आव्हान दिले.

भ्रष्टाचार लपवण्यासाठी स्थायी समितीच्या बैठका होऊ दिल्या नाहीत. मुंबई मनपा लेखापरीक्षक, लोकायुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, असेही देशपांडे म्हणाले.

किशोरी पेडणेकर यांच्याकडून खंडन

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेच्या आरोपांचे खंडन केले आहे. मनसेने आरोप केला म्हणून स्पष्टीकरण नाही, पण हा घोटाळा नाहीच. मनसेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. ‘किश कंपनी’ आताची नाही, दहा वर्षांपासून ती कंपनी आहे. मनसेला फक्त भुंकता येते, बाकी काही करता येत नाही, अशी टीकाही किशोरी पेडणेकर यांनी केली.

(MNS Sandeep Deshpande alleges Mumbai Mayor Kishori Pednekar gave COVID Center contract to Son Saiprasad Pednekar)

निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.