…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल : संदीप देशपांडे

येणाऱ्या निवडणुकीत मुंबई महापालिकेतील विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.

...म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल : संदीप देशपांडे
संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 9:51 AM

मुंबई : विरप्पनने जेवढं लुटलं नसेल त्यापेक्षा जास्त मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी लुटलं आहे, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत विरप्पनचा एन्काऊंटर करावाच लागेल, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय. (MNS Sandeep Deshpande Attacked On Shivsena Over BMC)

मुंबई महापालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय टिकाटिप्पणीला सुरुवात झालीय. मुंबई महापालिकेतल्या कारभारावरुन अनेक वेळा शिवसेनेला डिवचणाऱ्या संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा सेनेवर निशाण साधलाय.

“मुंबई महापालिकेत विरप्पन गँग काम करत आहे. ही विरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल”, असं म्हणत देशपांडे यांनी सेनेवर टीकास्त्र डागलंय.

“रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा किंवा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन”, असा निर्धार देशपांडे यांनी बोलून दाखवला.

“पालिकेतील सत्ताधारी हे त्यांच्याच लोकांना काम देत असून यात मोठी लूट आहे. या लूटीविरोधात मनसे आता सर्व पालिका निवडणुकीत जोमाने उतरणार आहे. आज पुन्हा एकदा पक्षाची बैठक असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत”, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

“कोरोनाच्या काळात सर्वसामान्य लोक त्यांच्या समस्या घेऊन लोक राज ठाकरे यांच्याकडे आले. राज ठाकरेंनीही जातीने लक्ष घालून त्या समस्या सोडवल्या. आता लोकांची लूट थांबवण्यासाठी मनसे पक्ष जोमाने उतरणार असून राज ठाकरे आम्हाला मार्गदर्शन करणार” असल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.

(MNS Sandeep Deshpande Attacked On Shivsena Over BMC)

हे ही वाचा :

” कंपाऊंडर” डोक्यावर पडलेत का???” सामनातील मथळ्यावरुन संदीप देशपांडेंची खोचक टीका

Sandeep Deshpande | …तोपर्यंत औरंगाबादचं नामांतर अशक्य, संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.